CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Unemployement in Goa : ...होय गोव्यात 70 टक्के पदवीधर बेरोजगार; मुख्यमंत्र्यांनी दिली कबुली

कौशल्य शिक्षणाला चालना देत बरोजगारी कमी करण्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं आवाहन

Unemployement in Goa: गोवा राज्यात 13 टक्के बेरोजगार आहेत, तसेच राज्यातील 70 टक्के पदवीधर बेरोजगार असल्याचे सीएमआयईच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहेे. हे मुख्यमंत्र्यांनी आज अप्रत्यरित्या मान्य केले. आणि यापुढे कौशल्य शिक्षणाला चालना देत बरोजगारी कमी करणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. नवीन शिक्षण धोरण आणि नॅक या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

( CM pramod sawant said 70 percent of Goa state graduates are unemployed )

दरम्यान पुढे बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 2014 साली कौशल्य शिक्षण कार्यक्रम सुरू केला आताच्या काळाची गरज ओळखून जर आम्ही शिक्षण दिले नाही तर राज्यातील बेरोजगारी वाढत राहील. यासाठी राज्यातील राज्यातील 64 महाविद्यालयांनी नवीन शिक्षण धोरणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण देणे गरजेचे असून बेरोजगारी कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटलं आहे.

CM Pramod Sawant
Mopa Airport : पर्यटकांच्या स्वागतासाठी मोपा विमानतळ सज्ज; 'या' तारखेपासून होणार खुलं

नॅकचे ए प्लस मानांकन प्राप्त झाले म्हणजे त्या महाविद्यालयात चांगले शिक्षण मिळते असे नाही

विद्यार्थी नवीन गोष्टी शिकतात त्यासाठी नव-नवीन उपक्रम राबविणे, महाविद्यालयांच्या आवारातून बाहेर पडून वेगळे उपक्रम राबविणे गरजेच आहे. नॅकचे ए प्लस मानांकन प्राप्त झाले म्हणजे त्या महाविद्यालयातील सर्वच विभागात चांगले शिक्षण मिळते असा त्याचा अर्थ होत नाही.

पूर्वी कोणत्या निकषांवर नॅकचे परीक्षण केले जायचे हे सांगितले जात नव्हते मात्र आता ही सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याप्रकारे काम काम करू शकता नॅकचे उद्देश हा शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आहे. यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे विचारांची देवाण-घेवाण होणे गरजेचे असल्याचे प्रा. भूषण भावे यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले.

CM Pramod Sawant
Goa Amona Bridge: आमोणा-खांडोळा पुलाची दुर्दशा; प्रशासन मोठा अनर्थ घडण्‍याची वाट बघतंय का?

गोवा विद्यापीठातील पदवीत्तर अभ्यासक्रमात नवीन शिक्षण धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यापीठात विभांगाद्वारे महाशाळांचे स्वरूप केले आहे. तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येणार आहे. संशोधन पार्क, तसेच येत्याकाळात 5 गावे दत्तक घेतली जातील. गोवा विद्यापीठाद्वारे बांगलादेशमधल्या विद्यापीठाशी सामंजस्य करार झालेला आहे त्याचसोबत सिंगापूर, कुवेत मधील विद्यापीठांशी करार करून करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com