Journalist Vaccination: लसी संपत आल्या आणि सरकारला पत्रकार आठवले

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 5 मे 2021

गोव्यातील पत्रकारांच्या लसिकरणाबाबत विचारले असता, "आम्ही पत्रकारांना लसी देण्याचा निर्णय घेतला असून शक्य तितक्या लवकर लसिकरणाची प्रक्रिया पूर्ण करू," असे सावंत यांनी सांगितले. मात्र एवढे लसीकरण होईपर्यंत सरकारला पत्रकार का आठवले नाहीत, असा मुद्दाउपस्थित होत आहे.

पणजी: देशात सगळीकडे कोरोनाचा कहर वाढतोय राज्याच्या आरोग्य विभागावरचा ताण वाढत आहे. आशातच देशात आणि राज्यातही लसींचा(vaccine) आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्या कोरोना रूग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा गाठला आहे. देशांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गित सापडण्याचे प्रमाण गोव्यामध्ये(Goa) असून ते 43 टक्के एवढे आहे आणि कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी बरीच खालावली असून ती 72.15 टक्के एवढी आहे. गोव्यात लसींकरण होत आहे.(CM Pramod Sawant said Will consider corona vaccine for journalists in Goa)

इतर राज्यातील पत्रकार(journalists) आणि त्यांच्या कुटुंबियांना लसीकरणात प्राधान्य मिळणार आहे. सर्व पत्रकारांना लस दिली जावी यासाठी काही राज्यांनी पावलं उचलली आहे. मात्र जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्रकारांना गोव्यातील पत्रकारांच्या लसींकरणाबाबत विचारले असता, "आम्ही पत्रकारांना लसी देण्याचा निर्णय घेतला असून शक्य तितक्या लवकर लसींकरणाची प्रक्रिया पूर्ण करू," असे सावंत यांनी सांगितले.महामारीतही भाजपा आमदार मालामाल होण्याची संधी शोधताहेत : गिरीश चोडणकरांचा आरोप 

गोवा राज्यासाठी 531,720 व्हॅक्सिन स्टाक देण्याची मंजूरी देण्यात आली. राज्यात कालपर्यंत 359,434 एवढे लसींकरण करण्यात झाले आहे. त्यापैकी कालपर्यंत पहिला डोज घेणाऱ्यांची सख्या 282,917 आहे तर दुसरा डोज घेणाऱ्यांची संख्या 76517 एवढी आहे. आणि आणखी राज्यात 165,880 जणांचे लसींकरण होणे बाकी आहेत. पत्रकारांना लस कधी मिळणार? असा प्रश्न केला असता  'लसी मिळाल्यावर पत्रकारांसाठी लसीकरण आयोजित करू' असे उत्तर सावंत यांनी दिले. ही कालपर्यतची आकडेवारी आहे. एवढे लसीकरण होईपर्यंत सरकारला पत्रकार का आठवले नाहीत, असा मुद्दा आता उपस्थित होत आहे.

गोव्यातील 8 तालूक्यात सूरू होणार कोरोना भरतीपूर्व हॉस्पिटल्स 

देशात उत्तर प्रदेश राज्य सरकारने, कर्नाटक राज्य सरकारने त्याचबरोबर पंजाब राज्य सरकारने ही पत्रकारांना “फ्रंटलाइन कामगार” म्हणून जाहीर केले आहे. पत्रकार दिवस रात्र कामानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागन होण्याची जास्त शक्यता आहे, त्यांमुळे त्यांच्या कुटूंबियांनाही कोरोनाचा धोका आहे. म्हणून पत्रकारांना “फ्रंटलाइन कामगार” म्हणून घोषित केले असून त्यांना प्राथमिकतेच्या आधारावर लसींकरणास पात्र ठरविले आहे.

कोरोना लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलिस प्रशासनासोबतच पत्रकारांची पण भुमिका महत्वाची आहे. देशाच्या कोरोना परीस्थितीचा आढावा घेवून नागरीकांपर्यंत ती माहीती पोहचविण्याच काम पत्रकारांनी केली आहे. त्याच बरोबर नागरीकांपर्यत बातम्या, माहीती मनोरंजन पोहचविण्याचं काम पत्रकारांनी केलंय आणि करत आहे. एप्रिल 2021 मध्ये कोरोना मुळे 52 हून अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली संस्थानाच्या अभिव्यक्ती अभ्यासानुसार, देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून 1 एप्रिल 2020 ते 2021 पर्यत 100 हून अधिक पत्रकार मरण पावले आहेत, असे गिल्डने  एका निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या