CM Pramod Sawant : संसद भवनला काँग्रेसकडून होणारा विरोध निरर्थकच

ऐतिहासिक सोहळा : सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantGomantak Digital Team

CM Pramod Sawant : लोकशाहीचे मंदिर असलेल्‍या संसद भवनाचे उद्‌घाटन रविवार दि. 28 मे रोजी नवी दिल्लीत होत आहे. या सोहळ्‍यावर बहिष्‍कार टाकून त्‍यास काँग्रेससह 18 पक्षांनी केलेला विरोध हा निरर्थक असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व राजकीय पक्षांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्सवाच्या अमृत काळात नवे संसद भवन उभारण्‍यात आले आहे. या भवनाचे उद्‌घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. प्रत्येक खासदार, आमदारांसह आमंत्रित लोकप्रतिनिधींनी या सोहळ्याला उपस्थित राहायला हवे. संसद भवन हे लोकांचे प्रश्‍‍न केंद्र सरकारच्या दरबारी मांडण्याचे अतिउच्च व्यासपीठ आहे. त्यामुळे हा सोहळा महत्त्वाचा आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

CM Pramod Sawant
विना कोचिंग क्लास गोव्याच्या लेकीचे UPSC परीक्षेत यश; CM सह सर्वांनी केलं कौतुक

यापूर्वी काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी संसदेशी संबंधित अनेक इमारतींचे उद्‌घाटन केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून उपस्थित करण्‍यात येत असलेले मुद्दे गैर लागू आहेत. विरोधकांना एकत्रित करण्याचा तो एक प्रयत्न आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी या सोहळ्याला उपस्‍थिती लावावी, असे आवाहन मुख्‍यमंत्री सावंत यांनी केले. दरम्‍यान, मुख्‍यमंत्री सावंत यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराजमंत्री गिरीराज सिंग यांची भेट घेतली.

CM Pramod Sawant
ST Community Reservation: बाळ्ळीच्या आंदोलनात युवा कार्यकर्त्यांचा बळी भाजप - संघामुळेच गेला:- शिरोडकर

नवी दिल्लीत होणाऱ्या संसद भवनाच्‍या उद्‌घाटन सोहळ्याला उपस्‍थित राहण्याची संधी मला मिळाली आहे. मी या सोहळ्याचा साक्षीदार बनत आहे व ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. याचे श्रेय गोमंतकीय जनतेला जाते.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com