Zuari Car Accident : 95 टक्के अपघात ड्रंक अँड ड्राईव्ह'मुळेच, त्यामुळे...

अपघातानंतर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Goa CM Pramod Sawant statement on Zuari Car Accident
Goa CM Pramod Sawant statement on Zuari Car AccidentDainik Gomantak

बुधवारी ध्यरात्री झुआरी पुलावरुन एक कार नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त डस्टर कार नौदल आणि तटरक्षक दलाकडून कार काढण्यात शोधपथकाला यश आले आहे. त्यानंतर कारमधील 4 मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत.

Goa CM Pramod Sawant statement on Zuari Car Accident
कोलवाळ जेल ड्रग्स तस्करी; दोघांना जामीन

अपघातानंतर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'गोव्यात आतापर्यंत रात्रीच्यावेळी झालेले 90 ते 95 टक्के अपघात हे 'ड्रंक अँड ड्राईव्ह'मुळे झाले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे पूर्णपणे बंद झाले पाहिजे.

खरतर मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांना फक्त दंड घेऊन सोडण्यात येते. पण यात बदल झाला पाहिजे. यावर निर्बंध घालण्यासाठी कायद्यात बदल करण्याचीही सरकारची तयारी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आप नेते अमित पालेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'झुआरी पुलावर जिथे खड्डे आणि रस्त्यामध्ये अंतर (गॅप) आहे, तिथून येणारी-जाणारी प्रत्येक गाडी सावकाश होते. त्याच ठिकाणाहून काल अपघात झालेली गाडी ब्रेक करून पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली.'

गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खाते आणि सरकार या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत कारण त्यांना गोव्यातील जनतेशी काही घेणेदेणेच नाही. सरकारने गोव्याला खड्ड्यात टाकले आहे. या किंवा कोणत्याही घटनेचे राजकारण करणे चुकीचेच आहे परंतु घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com