Goa Student| कधी होणार मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद? तब्बल दोन वेळा हा संवाद झाला रद्द

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्षेत विद्यार्थ्यांशी
Students in Goa
Students in Goa Dainik Gomantak

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा 17 सप्टेंबर रोजी होणारा सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशी होणारा ऑनलाइन संवाद रद्द झाला आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी शाळांना जारी केलेल्या परिपत्रकात माहिती दिली आहे.

(CM Pramod Sawant's online interaction with students of government primary schools on September 17 has been cancelled)

Students in Goa
Goa Politics| गोव्याच्या राजकारणाला पक्षांतराची कीड!

की, परस्परसंवाद पुन्हा शेड्यूल करण्यात आला असून नवीन तारीख आणि वेळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. ज्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी ऑनलाइन संवाद साधायचा होता, त्यांना 17 सप्टेंबर रोजी वर्गात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पीटीएच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते.

तब्बल दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम केला रद्द

राज्यात दहावी व बारावी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काल 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार होते. ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे व त्यांच्यासमोर असलेली आव्हाने या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार हेते. @GoaCM व @DrPramodPSawant फेसबूकवर हा संवाद उपलब्ध असणार होता. या संवादावेळी विशेष मुलांनाही सहभागी करण्यात आले होते. त्यांना हा संवाद कळावा यासाठी भाषा संकेत दुभाषांची उपलब्ध करण्यात येणार होता. या संवादासाठी काही माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती. त्यासंदर्भातची तयारीही शाळांनी केली होती. हा संवाद गेल्या 6 ऑगस्टला होणार होता. मात्र, त्या दिवशी बोरी येथे अपघात होऊन वीज खात्याचे तीन कर्मचारी ठार झाल्याने मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला होता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com