मुख्यमंत्र्यांनी नुवेत आरोग्य  केंद्र उभारावे - विल्फ्रेड डिसा

मुख्यमंत्र्यांनी नुवेत आरोग्य  केंद्र उभारावे - विल्फ्रेड डिसा
disa.jpg

सासष्टी: नुवे मतदारसंघात (Nuvem constituency) आरोग्य केंद्र नसल्याने नुवेवासीयांना उपचारासाठी दुसऱ्या मतदारसंघात जावे लागत असून कोरोनाच्या काळातही नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. नागरिकांना भेडसावणारी ही समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याकडे नुवे मतदारसंघात आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी दिली. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे माजोर्डा नुवे येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड दक्षता केंद्राची पाहणी करण्यासाठी आले असता, मुख्यमंत्र्यांकडे आमदार विल्फ्रेड डिसा (Wilfred Disa) यांनी वरील मागणी केली. नुवे मतदारसंघातील लोकांच्या भल्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले असून पूर्वीच्या वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करून याचा वापर केंद्रासाठी करण्यात आला आहे. नुवेत ज्या इमारतीत केंद्र सुरू करण्यात आले आहे त्या इमारतीत आरोग्य केंद्र सुरू करणे शक्य असून आरोग्य केंद्र उभारल्यास नुवेवासीयांना निश्चितच याचा फायदा होणार आहे, असे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी सांगितले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com