गोवा पर्यटनासाठी मुख्यमंत्र्यांचे एक पाऊल पुढे! आता सर्व माहिती मिळणार एका क्लिकवर

राज्य पर्यटन विभाग आणि जीटीडीसी आणि गोवा सरकारतर्फे आता सर्व पर्यटन संबंधित व्यवसाय ऑनलाईन रजिस्टर करण्याचा उपक्रम राबवला जात आहे.
गोवा पर्यटनासाठी मुख्यमंत्र्यांचे एक पाऊल पुढे! आता सर्व माहिती मिळणार एका क्लिकवर
Goa Tourism Latest News Dainik Gomantak

Goa Tourism : गोवा हे राज्य देश-परदेशातील पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे. दरवर्षी गोव्यामध्ये लाखो पर्यटक धमाल मस्ती करण्यासाठी मित्रमंडळी आणि परिवारासोबत दाखल होत असतात. गोव्याचे पर्यटन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी गोवा सरकार सतत प्रयत्न करत असतात. असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आता सरकारतर्फे राबवण्यात येत आहे. राज्य पर्यटन विभाग आणि जीटीडीसी आणि गोवा सरकारतर्फे आता सर्व पर्यटन संबंधित व्यवसाय ऑनलाईन रजिस्टर करण्याचा उपक्रम राबवला जात आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना या गोष्टीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, गोवा राज्य हे देशातील पर्यटनाची राजधानी बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आह. यासाठी फक्त हॉटेल इंडस्ट्रीच नव्हे तर जलक्रीडा, पर्यटक मार्गदर्शक तसेच पर्यटनाशी संबंधित सर्व भागधारकांना एकत्रित आणण्याची गरज आहे. यासाठी सरकार विशेष यंत्रणा राबवत असून यामध्ये पर्यटनाशी संबंधित लहान-मोठे सर्व भागधारक सामील होतील असे प्रयत्न आम्ही करत आहोत. (CM's step forward for Goa tourism! Now you can get all the information with one click)

Goa Tourism Latest News
काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्प 10 मे पासून प्रायोगिक तत्वावर सुरु

या यंत्रणेचा विशेष फायदा म्हणजे सर्व व्यवसाय हे अधिकृतरित्या गोवा सरकार सोबत जोडले जातील आणि त्याचबरोबर सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर या सर्व लहान-मोठ्या व्यवसायांची प्रसिद्धीही होईल. म्हणजेच इथून पुढे ही संपूर्ण व्यवस्था सरकारी पद्धतीने कामकाज करेल. त्याचबरोबर गोव्यात येणार्‍या पर्यटकांना गोव्यात पर्यटनाशी संबंधित असलेले अधिकृत भागधारक कोणते, उपक्रम कोणते त्याची एकाच ठिकाणी माहिती मिळू शकेल. शिवाय या गोष्टीची दुसरी बाजू म्हणजे पर्यटनाशी संबंधित कोणतेही बेकायदेशीर कृत्य किंवा कोणत्याही अनधिकृत व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही आणि यासाठी पर्यटन विभागासोबतच गोवा पोलीस प्रशासन आणि अबकारी खाते एकत्रितपणे काम करणार आहेत. अशा पद्धतीने कामकाज केल्यास गोव्याचे पर्यटन क्षेत्र अजून विकसित होण्यास मदत होईल.

ते पुढे म्हणाले की, मोपा विमानतळ आता येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे याचे सर्व श्रेय जनतेला आणि त्यासंबंधित सर्वांना जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही गोष्ट होऊ शकली. आणि इथून पुढेही या नव्या उपक्रमांमध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.

मॉन्सून पर्यटनाची प्रसिद्धी...

आपण बघतो बऱ्याचदा गोव्यात येणारे पर्यटक हे समुद्र किनार्‍यावरच जाणे जास्त पसंत करतात. गोव्यात असे अनेक अभयारण्य आहेत जे विकसित होणे आणि पर्यटकांपर्यंत त्याची माहिती पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. अशासाठी आपण 'पेड पब्लिक ट्रान्सपोर्ट' ही पर्यटन विभाग आणि कदंब कॉर्पोरेशन संलग्नित एक परिवहन व्यवस्था तयार करत आहोत. प्रामुख्याने शनिवारी आणि रविवारी पर्यटकांसाठी या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस कार्यरत असतील. मॉन्सून पर्यटन विकसित करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

पर्यटन विकसित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचे आहे आणि मला वाटतं यासाठी हॉटेल व्यावसायिक जर सरकारसोबत एकत्र आले तर याचा खूप मोठ्या प्रमाणावर गोव्याच्या पर्यटनासाठी फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या भेटीने गोव्याच्या पर्यटन विकासाला मिळाली नवी दिशा..

काही दिवसांपूर्वी झालेल्या पंतप्रधानांच्या भेटीमध्ये G20 Summit चे उपक्रम जे देशामध्ये होणार आहेत त्यातील एक इव्हेंट गोव्यामध्ये करण्याची मागणी पंतप्रधान यांना केली असता त्यांनी आश्वासन दिले आहे की सर्व इव्हेंट्सपैकी एक कार्यक्रम गोव्यामध्ये नक्की होईल. गोवेकरांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची ही एक सुवर्णसंधी असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.