मुख्यमंत्र्यांचा आज  विद्यार्थ्यांशी ऑनलाईनने संवाद 

विलास महाडिक
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे व त्यांच्यासमोर असलेली आव्हाने या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

पणजी

राज्यात दहावी व बारावी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्या १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे व त्यांच्यासमोर असलेली आव्हाने या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. @GoaCM व @DrPramodPSawant फेसबूकवर हा संवाद उपलब्ध असणार आहे. या संवादावेळी विशेष मुलांनाही सहभागी करण्यात आले आहे. त्यांना हा संवाद कळावा यासाठी भाषा संकेत दुभाषांची उपलब्ध करण्यात येणार आहे. या संवादासाठी काही माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भातची तयारीही शाळांनी केली आहे. हा संवाद गेल्या ६ ऑगस्टला होणार होता. मात्र, त्या दिवशी बोरी येथे अपघात होऊन वीज खात्याचे तीन कर्मचारी ठार झाल्याने मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला होता. 

संबंधित बातम्या