शंभर टक्के कोविड लसीकरणाचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटारडा: दिगंबर कामत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांचा दावा हा भाजप सरकारच्या खोटारडेपणाचाच भाग असल्याची टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली आहे.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak

मडगाव: सत्य परिस्थिती वेगळी असताना, भाजप सरकारने नेहमीच खोट्या माहितीच्या आधारे जनतेसमोर आपली कामगिरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्यात पात्र नागरीकांचे 100 टक्के कोविड लसीकरण (Vaccination) झाल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांचा दावा हा भाजप सरकारच्या खोटारडेपणाचाच भाग असल्याची टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली आहे. गोव्यात श्री गणेश चतुर्थी साजरी होत असतानाच मुख्यमंत्र्यानी धडधडीत खोटे बोलावे हे धक्कादायक आहे. भाजप आज देवालाही भित यावरुन अगदी स्पष्ट झाले आहे असे दिगंबर कामत म्हणाले.

Digambar Kamat
Goa Vaccination: शंभर टक्के लसीकरणाचा दावा कितपत खरा

आज अनेक पात्र गोमंतकीयांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतलेला नाही ही सत्य परिस्थिती आहे. परंतु सरकार मात्र शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाल्याचा दावा करते हे चुकीचे आहे. खोटारडेपणा हा आज भाजपच्या नावाशी जोडला गेला आहे. भाजप प्रत्येक संधीचा फायदा घेत जुमलाबाजी करीत आहे. कोविड महामारीत भाजपने आजाराचा बाजार केला हे सर्वांनी पाहिले आहे असे दिगंबर कामत म्हणाले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा करण्यापुर्वी तथ्य व आकडेवारी तपासणे गरजेचे आहे. भाजपने अतीघाई करुन गोवा "ग्रिन झोन" जाहिर केल्यानंतर गेल्यावर्षी गोव्यावर कोविडचे भयंकर संकट ओढवले होते याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली आहे.

Digambar Kamat
COVID-19: लसीकरणा मध्ये गर्भवती महिलांना प्राधान्य देण्याची शिफारस

असंवेदनशील भाजप सरकारने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही कोविड रुग्ण दगावला नसल्याचा धादांत खोटा दावा केला. आज भाजपचा खोटारडेपणा लोक बघत आहेत. सत्यव लोकशक्तीचा नेहमीच विजय होतो. गोमंतकीय भाजपच्या खोटारडेपणाला धडा शिकवतील याचा मला विश्वास आहे असे दिगंबर कामत म्हणाले. बेजबाबदार भाजप सरकारने गोव्याला हागणदारी मुक्त जाहिर केले. सरकार मात्र आजही नवीन शौचालये बांधत आहे व मोबाईल टॉयलेट्स ऑर्डर करीत आहे. लोक अजुनही गोव्यातील कित्येक भागात उघड्यावर शौचास जात आहेत.

Digambar Kamat
Goa HSC Results 2021: डिचोलीतील 'या' शाळेचा शंभर टक्के निकाल

सार्वजनीक बांधकाम मंत्र्यांच्या मतदारसंघात लोक अजुनही नळ जोडणी नसल्याने विहीर व नदीचे पाणी वापरत असताना, भाजप सरकारने गोव्यातील ग्रामिण भागात शंभर टक्के नळ जोडणी झाल्याचे जाहिर केले होते याची आठवण सुद्धा दिगंबर कामत यांनी करुन दिली आहे. भाजपचे जुमला राजकारण संपविण्याची आता वेळ आली असुन, गोमंतकीयांनी आता भाजपचे मंत्री व आमदारांना त्यांच्या खोटारडेपणा बद्दल जाब विचारणे गरजेचे आहे. भाजपचा फेक प्रचार थांबविणे गरजेचे आहे असे कामत यांनी म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com