Co Working Space in Goa : गोव्यात जाऊन काम करायचंय? या किनाऱ्यांवर सुरु होतेय 'कोवर्किंग स्पेस'

गोव्यात सुट्टीसाठी आलेल्या कॉर्पोरेटमधील पर्यटकांना याचा फायदा होणार आहे, ज्यांना गोव्यातील किनारपट्टीचा आस्वाद घेत काम करण्याची इच्छा आहे.
goa beach
goa beachDainik Gomantak

Co Working Space in Goa : गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने गोव्यातील कोवर्किंग स्पेससाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खात्याच्या प्रस्तावित कोवर्किंग स्पेसच्या डेक उभारणीसाठी सीझेडएमपी म्हणजेच किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. गोव्यात सुट्टीसाठी आलेल्या कॉर्पोरेटमधील पर्यटकांना याचा फायदा होणार आहे, ज्यांना गोव्यातील किनारपट्टीचा आस्वाद घेत काम करण्याची इच्छा आहे.

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. साहजिकच मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. यापैकी बरेचजण वर्क फ्रॉम होम करत सुट्टीची मजा लुटत आहेत. मात्र आता लवकरच गोव्यात समुद्रकिनाऱ्यांवर कोवर्किंग स्पेस तयार केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात आश्वे, मोरजी, मिरामार आणि बाणावली या किनाऱ्यांवर या कोवर्किंग प्लेस उभारल्या जाणार आहेत.

गोव्यात बीचवर कोवर्किंग स्पेसची संकल्पना कोरोनाकाळात समोर आली होती. मिरामार बीचजवळ माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या समाधीजवळ, तर मोरजीत कासवांसाठी संरक्षित असलेल्या राखीव जागेशेजारीच ही कोवर्किंग स्पेस उभारली जाणार आहे. गोव्यात काही पर्यटकांना कासवांच्या नेस्टिंगचा अनुभव घेण्याची इच्छा असते. मात्र या गोष्टी रात्रीच घटत असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. मात्र कोवर्किंग स्पेसच्या माध्यमातून आता पर्यटकांना कासवांचा अधिवास अगदी जवळून पाहता आणि अनुभवता येणार आहे. या स्पेसच्या निर्मितीवेळी बीचवरील कासव संवर्धनाला किंवा बीचच्या कोणत्याही भागाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

goa beach
Vijai Sardesai: गोव्यातील गरिबांचा तांदूळही कर्नाटकात पळवला; हेच का तुमचं अंत्योदय ?

मोरजीतील या कोवर्किंग स्पेसचा काही भाग कासव माहिती केंद्र म्हणून वापरला जाणार असून वन खात्याकडून सांभाळला जाणार आहे. या प्लेसच्या माध्यमातून कासवांबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न वनखातं करणार आहे. कोवर्किंग स्पेस ज्याजागी बनवली जाणार आहे त्या जागीत शॅकचं साहित्य ठेवलं जातं.

मात्र शॅक चालकांना विश्वासात घेऊन ही जागा कोवर्किंग स्पेससाठी दिली जाणार आहे. या स्पेसच्या माध्यमातून त्यांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. हे बांधकाम पूर्णपणे लाकडी असणार अशी माहिती असून याचा प्रस्तावही माहिती आणि तंत्रज्ञान खात्याकडून देण्यात आला आहे. कोणत्याही वर्किंग स्पेससाठी बीचवरील इकोसिस्टीमला धक्का लागणार नाही याची पुरेशी काळजी घेतली जाणार आहे. या कोवर्किंग स्पेससाठी सर्व सुविधाही उपलब्ध पुरवल्या जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com