गोवा विधानसभा अधिवेशन : विरोधकांच्या 'कोळसा आमका नाका'च्या घोषणा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

नवीन वर्षातील पहिल्या गोवा विधानसभा अधिवेशनाला आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आभिभाषणाने सुरूवात झाली.

पणजी :  नवीन वर्षातील पहिल्या गोवा विधानसभा अधिवेशनाला आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आभिभाषणाने सुरूवात झाली. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केवळ साडेतीन मिनिटांचे अभिभाषण केले. सभापती राजेश पाटणेकर सर्व भाषण सभागृहाचे कामकाज झाल्यानंतर जाहीर करतील.

गोवा विधानसभा अधिवेशन: या सरकारला अधिवेशनात  उघडे पाडू: सरदेसाई 

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी कोळसा नको, कोळसा नको, आम्हाला कोळसा नको अशा घोषणा दिल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अभिभाषण करून परत जात असताना विरोधी  पक्षांच्या आमदारांनी फलक दाखवत घोषणा दिल्या. विरोधी आमदार निषेध  म्हणून दंडाला काळ्या फिती बांधूनच विधानसभेत आले आहेत.

गोवा विधानसभा अधिवेशन आजपासून सुरू

संबंधित बातम्या