Coal Transport: ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा- दाजी साळकर

ट्रकमालक संघटनेने केलेला दावा तथ्यहीन
Coal Transport
Coal TransportDainik Gomantak

कोळसावाहू ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरला जातो, हे वास्कोवासीयांनी पाहिले आहे. त्यामुळे सालसेत ट्रकमालक संघटनेने केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नाही. मुरगाव बंदर प्राधिकरण व गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कोळसा प्रदूषण होऊ नये, यासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, त्यांची अंमलबजावणी करण्यावर ट्रकमालकांनी भर द्यावा. शिवाय सरकारी यंत्रणेनेही यावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी स्पष्ट केले.

मांगोरहिल येथे भू-गटार वाहिन्यांच्या कामास प्रारंभ आमदार साळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सतीश च्यारी, प्रशांत नार्वेकर, सिद्धार्थ कासकर उपस्थित होते. मायमोळे, मेस्तावाडा येथे लवकरच भू-गटार वाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात येईल. त्यासाठी काही ठिकाणी भू-संपादन केले आहे, असेही साळकर म्हणाले.

Coal Transport
Arambol: हरमल किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

...अन्यथा ट्रकचालकांवर कारवाई करा

ट्रकच्या हौद्यात प्रमाणापेक्षा जास्त कोळसा भरला जातो. त्यावर ताडपत्री घातली जाते. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरल्याने कोळशाची भुकटी आणि तुकडे रस्त्यावर पडून प्रदूषण होते. सालसेत ट्रकमालक संघटनने केलेला दावा आम्हाला पटत नाही. ओव्हरलोड कोळसा नेणाऱ्या ट्रकचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली असल्याची माहिती साळकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com