कोळसा वाहतुकीचे प्रमाण पुढे कमी होईल - दक्षिण रेल्वेची हमी 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

रेलमार्ग दुपदरीकरण कामाच्या बाबतीत स्थानिक आमदर, जिल्हा प्रशासन व राज्य सरकारची मते निर्णायक ठरतील तसेच कोळसा वाहतुकीची मर्यादा राज्य नियंत्रण मंडळ निश्चित करणार आहे  असे दक्षिण पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे

 

 

मडगाव ः रेलमार्ग दुपदरीकरण कामाच्या बाबतीत स्थानिक आमदर, जिल्हा प्रशासन व राज्य सरकारची मते निर्णायक ठरतील तसेच कोळसा वाहतुकीची मर्यादा राज्य नियंत्रण मंडळ निश्चित करणार आहे  असे दक्षिण पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. कोळसा वाहतूकीचे प्रमाण पुढील दोन वर्षांत कमीकमी होत जाणार आहे, अशी हमीही दक्षिण पश्चिम रेल्वेने दिली आहे.

   रेलमार्ग दुपदरीकरणास होत असलेल्या विरोधाची जाणीव आम्हाला आहे. जनतेच्या शंकांचे निरसन करून व त्यांच्या समस्यांवर तोडगा काढून रेलमार्ग दुपदरीकरणाचे बंद ठेवलेले काम हाती घेण्यात येईल, असे दक्षिण पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक पी. के. मिश्रा यांनी आॅनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी ई. विजया उपस्थित होत्या.

वास्को ते होस्पेट या 342 किलोमीटर रेलमार्गाचे दुपदरीकरण कोळसा वाहतूक नजरेसमोर ठेवून नव्हे तर प्रवासी रेल्वे व मालगाडी वाहतुकीत वाढ करण्याच्या दृष्टीने करण्यात येत आहे. पश्चिम घाटातील वनराई व जैवसंपदेला धक्का बसणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे

जगभरात कोळसा वाहतुकीचे प्रमाण खाली येत आहे. गेल्या चार वर्षात दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कोळसा वाहतुकीत 30 टक्के घट झालेली आहे. घट होण्याचे हे प्रमाण पुढेही सुरु राहणार काही वर्षांत कोळसा वाहतूक शुन्यावर येणार आहे, अशी शक्यता विजया यांनी व्यक्त केली. 

संबंधित बातम्या