किनारी पोलिसांकडून जनजागृती

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

मत्स्यव्यावसायिकाना करोना विषयी घ्यायच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन केले.मासेमारी करणाऱ्याबोटी,त्यावर काम करणारे मच्छिमार यांनी विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

काणकोण

काणकोणच्या तळपण जेटी,राजबाग-तारीर, पाळोळे,पाटणे,आगोंद या किनारी भागात  किनारी पोलिसाकडून करोना विषयी जनजागृती करण्यात आली.बेतूल तटरक्षक दलाचे पोलिस निरीक्षक नवलेश देसाई याच्या मार्गदर्शनाखाली काणकोणच्या वेगवेगळ्या किनारी भागात पोलिसांनी मत्स्यव्यावसायिकाना करोना विषयी घ्यायच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन केले.मासेमारी करणाऱ्याबोटी,त्यावर काम करणारे मच्छिमार यांनी विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

किनारी पोलिस दलाचे पोलिस चोवीस तास परराज्यातील बोटीवर लक्ष ठेवून आहेत.त्यांना गोव्याच्या हद्दीत येऊन मासेमारी करण्यावर रोख लावण्यात आला आहे.त्याचप्रमाणे राज्यातील मच्छिमाराना समुद्रात मासेमारी करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.मत्स्यव्यावसायिकानी सामाजिक दुरी राखणे गरजेचे असल्याचे या जनजागृती कार्यक्रमात जोर देण्यात आला असल्याचे पोलिस निरिक्षक नवलेश देसाई यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या