बागा येथील डोंगरकडा कोसळल्या

Santosh Govekar
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

राज्यात गेल्या महिन्याभरात संततधार पडणाऱ्या पावसामुळे बागा येथील डोंगमाथ्यावरील कडा कोसळण्याचा प्रकार घडल्याने स्‍थानिकात भितीचे वातावरण पसरले आहे. हा प्रकार गेल्‍या पाच - सहा दिवसांपासून सुरू असल्‍याने डोंगरमाथ्यावर असलेल्या सेंट झेवियर रिट्रीट सेंटरला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विलास ओहाळ

कळंगुट :

दोन वर्षाआधी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्याने अंदाजे दोन कोटी खर्चून येथील डोंगर पायथ्याशी संरक्षक भिंतींची उभारणी करण्यात आली होती. दरम्यान, यंदाच्या वर्षी याभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गेल्या आठ दहा दिवसांत याभागात डोंगरकडा कोसळण्यास सुरवात झाली होती.
येथील डोंगरमाथ्यावर कार्यरत असलेल्या रिट्रीट सेंटरमध्ये नियमितपणे जाणाऱ्या धार्मिक प्रार्थनेसाठी जाणाऱ्या भाविकांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी स्वत: पुढाकार घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्याने जेसीबीच्‍या सहाय्‍याने कोसळलेल्या मातीचा भराव टाकण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या एक दोन दिवसांत याभागातील रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन त्‍यांनी दिले आहे.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या