
Illegal Cutting of Khair Trees in Goa: तामसडो-धारबांदोडा येथील जंगलातून खैर वृक्षाची तस्करी करणाऱ्या 11 संशयितांना ताब्यात घेतले असून दोन वाहने, एक एअरगन पिस्तूल, चार लाखांची रोख रक्कम, एक सोन्याची चेन, दोन अंगठ्या व एक लाकूड कापण्याचे बॅटरीवर चालणारे मशीन जप्त करण्यात आले.
कुळे वन खात्याने ही कारवाई केली असून खैराच्या झाडांची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे.
कुळे वन खात्याचे रेंज फॉरेस्टर नारायण प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सर्व्हे नं. 7 तामसडो-धारबांदोडा येथील जंगलात बेकायदा खैराच्या झाडाची कत्तल सुरू असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली.
खैराच्या झाडांची कत्तल करून सुमो गाडीमध्ये (क्र. जीए.04 सी.3296) भरून पळण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांना रंगेहाथ पकडले, तर या प्रकरणाचा सूत्रधार संदेश नाईक याच्यासह त्याच्या स्कॉर्पिओमध्ये (क्र. जीए.01आर.7387) बसलेल्या आणखी तिघांना पकडण्यात आले.
सागवानापेक्षाही खैराला महत्त्व
सागवान लाकडापेक्षा खैराच्या झाडाला अधिक महत्त्व असते. दरही अधिक मिळतो. त्यासाठीच बंदी असूनही या झाडांची कत्तल केली जाते. खाण्याचे पान बनविताना त्यात खैराच्या झाडापासून बनवलेला ‘कात’ टाकतात. त्यामुळे विशिष्ट चव निर्माण होऊन पान रंगते.
त्यासाठीच या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. जंगलात या झाडांची कत्तल कोणी करत असेल तर ग्रामस्थांनी वन खात्याला माहिती द्यावी, असे आवाहन वन अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.