Goa Crime: कोलवा मसाज पार्लर चालकाला आठ वर्षांची कैद; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

Colva: मानवी तस्करी केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून 8 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली.
Court
CourtDainik Gomantak

Margao: आयुर्वेदिक मसाज पार्लरच्या नावाखाली कोलवा येथे कुंटणखाना चालविल्‍या प्रकरणी सूरज शर्मा या आरोपीला काल दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर (Sessions Judge Pooja Kavalekar) यांनी मानवी तस्करी केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून 8 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. तर, त्याचा सहकारी संतोष सोनावणे याला अनैतिक व्यवहार कायद्याखाली दोषी ठरवून ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्‍हणजे मानवी तस्करी कायद्याखाली गोव्यात सुनावलेली ही पहिलीच शिक्षा आहे.

न्‍यायालयाच्‍या या निवाड्याकडे महत्त्वपूर्ण निवाडा म्हणून पाहिले जात आहे. 6 फेब्रुवारी 2021 रोजी क्राईम ब्रँचने कोलवा येथील पार्लरवर धाड घालून 4 युवतींची सुटका केली होती. यावेळी पार्लरमध्ये कंडोमची पाकिटेही मिळाली होती. या प्रकरणी एकूण 11 साक्षीदारांच्या साक्षी पेश करण्यात आल्या.

Court
Goa BJP: डिचोलीतील 15 क्षयरोग रुग्ण भाजपकडून दत्तक!

सरकारी वकील म्हणून एस. सामंत यांनी बाजू मांडली. संशयितांच्या वतीने युक्तिवाद करताना त्‍यांच्‍या वकिलाने सांगितले की, या प्रकरणात ज्या युवतींची सुटका करण्यात आली आहे, त्या स्वतःच्या मर्जीने या व्यवसायात आल्या होत्या.

मात्र मानवी तस्करी प्रकरणात पीडितांची स्वतःची मर्जी हा आरोपीसाठी बचाव होऊ शकत नाही असे न्या. कवळेकर यांनी आपल्या निवाड्यात म्हटले आहे.संशयिताला दोन लहान मुले असल्‍याने असून त्याला दया दाखवून कमी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र मानवी तस्करी प्रकरणात दया दाखविता येणे शक्य नाही असा अभिप्राय न्‍यायालयाने दिला.

Court
Goa Rain Update: राज्यात येत्या पाच दिवसात तुरळक पावसाची शक्यता

अरुण पांडे, 'अर्ज'चे प्रवर्तक-

न्‍यायालयाच्‍या निकालाचे स्वागत. अशा निकालामुळे भविष्यात मानवी तस्‍करीला आळा बसेल. तसेच असे धाडस करताना संबंधित व्‍यक्ती हजार वेळा विचार करेल. महिलांचे शोषण आणि अन्‍यायाविरोधात आम्‍ही आवाज उठवत राहू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com