कोलवा येथे मसाज पार्लरच्या नावाखाली कुंठणखाना चालविणारे दोघे दोषी

दोषी दोघांना न्यायालय 14 सप्टेंबर ठोठावणार शिक्षा
Court
CourtDainik Gomantak

मडगाव: कोलवा येथे मसाज पार्लरच्या नावाखाली कुंठणखाना चालविण्यात येत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गुन्हे अन्वेशन विभागाने कोलवा येथे 16 फेब्रुवारी 2021 रोजी चालू असलेल्या या मसाज पार्लरवर धाड टाकत कारवाई केली होती. या प्रकरणात न्यायालयाने आज निकाल दिला असून न्यायलयाने मसाज पार्लरच्या नावाखाली कुंठणखाना चालविणारे दोघे दोषी असल्याचं म्हटलं आहे.

(colva two convicts who run Kuntankhana in the name of massage parlour)

Court
येत्या तीन दिवसात राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता - IMD

दोषी असलेल्यांमध्ये सूरज शर्मा व संतोष सोनवणे अशी दोघांची नावे आहेत. आज अतिरीक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी त्यांना दोषी ठरविले आहे. यातील दोषींना 14 सप्टेंबर रोजी दोन्ही आरोपींची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना शिक्षा ठोठवण्यात येणार आहे.

Court
'Sill Soul Cafe: प्रकरणात स्मृती इराणी यांनी देशाची माफी मागावी'

मिळालेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हे अन्वेशन विभागाने कोलवा येथे चालू मसाज पार्लरवर धाड घालून अनैतिक धंद्याला जुंपलेल्या पाच युवतींची सुटका केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याचा आज निकाल लागला असून दोघांना ही दोषी ठरवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com