कोलवाळ कारागृहाचा तुरुंगरक्षक ड्रग्ज घेऊन जाताना अटकेत

कोलवाळ येथील कारागृहाची सुरक्षाव्यवस्था बेभरवाशाची; चौकशी सुरु
कोलवाळ कारागृहाचा तुरुंगरक्षक ड्रग्ज घेऊन जाताना अटकेत
Colvale JailDainik Gomantak

पणजी : कोलवाळ येथील कारागृहाची सुरक्षाव्यवस्था बेभरवाशाची बनली आहे हे आज तुरुंगरक्षकालाच ड्रग्स घेऊन आत प्रवेश करताना प्रवेशद्वारावरील आयआरबीच्या पोलिसांनी तपासणीवेळी ताब्यात घेतले. तुरुंगरक्षक सूरज गावडे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास कोलवाळ पोलीस करत आहे. या प्रकरणामुळे तुरुंगरक्षकांचे कैद्यांशी असलेल्या लागेबांधे याचा पर्दाफाश झाला आहे.

काही दिवसांपूर्वी या कारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षारक्षकाला ड्रग्जप्रकरणी अटक झाली होती. त्यामुळे या कारागृहात असलेल्या तुरुंग तसेच सुरक्षारक्षकांचे कैद्यांशी असलेले साटेलोटे याचा पर्दाफाश होत असताना मात्र कारागृहाच्या अधिकारी मात्र ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरले आहेत. ड्युटीवर असलेला तुरुंगरक्षक सूरज गावडे हा आतमध्ये प्रवेश कऱण्यापूर्वी त्याला आयआरबी पोलिसांनी तपासणी केली, असता त्‍याच्याजवळ 4 ग्रॅम ड्रग्ज सापडला असून तो कोकेन असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Colvale Jail
बेकायदेशीर रेती उपसा करणाऱ्या 35 होड्या काढल्या भंगारात

अंमलीपदार्थप्रकरणी कोलवाळ कारागृहात असलेल्या एका नायजेरियन कैद्याला देण्यासाठी तो घेऊन जात असल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणाची माहिती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर त्याची तक्रार कोलवाळ पोलिस स्थानकाकडे देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची पोलिसांची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत कारागृहात सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com