Assnora Chain Snatching: अस्नोडा येथे चेन स्नॅचिंग प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या

चेन स्नॅचिंग प्रकरणात कोलवाळ पोलिसांनी केली कारवाई
Colvale police
Colvale policeDainik Gomantak

गोवा राज्यात गेले काही दिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज कोलवाळ पोलिसांनी अस्नोडा येथे चेन स्नॅचिंग प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(Colvale police chain snatching case arrests Ashpak Kadur Hussain Rashid )

Colvale police
Goa Latest News: पहिली पिंक ऑटो खरेदी करणारी गोव्यातील 'प्रीती केरकर'

मिळालेल्या माहितीनुसार अस्नोडा येथे चेन स्नॅचिंग प्रकरणे वाढले असल्याची तक्रार नागरीकांनी अनेकवेळा पोलिसांकडे केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज सापळा लावत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अश्पाक कदूर (25) आणि हुसेन रशीद (23) अशी संशयितांची नावे असून दोघे ही वास्को येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

Colvale police
Jacinto Island Accident: भरधाव कारची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांकडून 1 लाख रुपये किमतीची 12 ग्रॅम वजनाची हिसकावलेल्या सोनसाखळी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच संशयितांचा आणखी कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का ? याचा तपास घेणे सुरु आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार संशयितांना पोलिस कोठडी सुनावण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे सातत्याने समोर येत आहे

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या महिला अत्याचाराला बळी पडत आहेत. परप्रांतीय महिलांना मसाज पार्लरसाठी गोव्यात आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराची अनेक प्रकरणे घडलेली आहेत.

घरगुती हिंसा, बलात्कार व अपहरण यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण गोव्यासारख्या लहान राज्यात वाढते आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरमहिना महिलांवर अत्याचाराची सरासरी 6 तर बलात्काराची 4 प्रकरणे नोंद होतात. पण बहुतांश महिला तक्रार करत नसल्‍यामुळे अनेक प्रकरणे बाहेर येत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com