वास्कोत मॉन्सूनपूर्व कामांना प्रारंभ

नगराध्यक्ष कासकर यांची माहिती: तीन प्रभागांत गटारांची साफसफाई
वास्कोत मॉन्सूनपूर्व कामांना प्रारंभ
Mormugao municipal council Dainik Gomantak

वास्को: मुरगाव पालिकेतर्फे मॉन्सूनपूर्व कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. एकूण पंचवीस प्रभागांपैकी एक, पाच आणि तेरा या तीन प्रभागांतील गटारांतील गाळ उपसण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. उरलेल्या 22 प्रभागांमध्ये लवकरच कामांना प्रारंभ होणार असल्याचे मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितले.

मुरगाव पालिकेतर्फे यापूर्वी फेब्रुवारी, मार्च महिन्यांमध्ये मॉन्सूनपूर्व कामांना प्रारंभ केला जात होता. गेल्या वर्षी पालिका निवडणुकीमुळे तसेच पालिकेवर प्रशासक असल्याने मॉन्सूनपूर्व कामे रेंगाळली होती. त्यामुळे पावसाळ्यात काही गटारे तुंबून तसेच पाण्याचा निचरा नीट न झाल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागला होता. यावर्षी मॉन्सूनपूर्व कामांना विलंब झाला आहे. सोमवार (ता. 2) पासून प्रारंभ झाला आहे. सध्या तीनच प्रभागांमध्ये गटारांची साफसफाई करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळा नजीक येऊन ठेपल्याने मुरगाव पालिकेला कामाची गती वाढवावी लागणार आहे. कामांचा वेग पाहता इतर प्रभागांतील कामे पावसाळ्यापूर्वी होतील काय अशी आशंका काहीजणांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.