कॉंग्रेसमध्ये सध्या दलालांची, कमिशनखोरांची चलती: उर्फान मुल्ला

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

कॉंग्रेसमध्ये सध्या दलालांची, कमिशनखोरांची चलती आहे. पक्षाचे फलक आणि मंडप घालण्याचे कमिशन खाणाऱ्यांनी माझी हाकालपट्टी केल्‍याचे समाधान मानू नये. माझ्या हाकालपट्टीत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा हात नाही, असे कॉंग्रेसचे राजीनामा दिलेले नेते उर्फान मुल्ला यांनी आज येथे सांगितले

दिवाळी भेट म्हणून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना कांदे, टोमॅटो

पणजी : कॉंग्रेसमध्ये सध्या दलालांची, कमिशनखोरांची चलती आहे. पक्षाचे फलक आणि मंडप घालण्याचे कमिशन खाणाऱ्यांनी माझी हाकालपट्टी केल्‍याचे समाधान मानू नये. माझ्या हाकालपट्टीत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा हात नाही, असे कॉंग्रेसचे राजीनामा दिलेले नेते उर्फान मुल्ला यांनी आज येथे सांगितले. कॉंग्रेसनचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई आज मुल्ला यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून हाकालपट्टी केल्याचे पत्र जारी केले.

त्याला प्रतुत्तर देताना मुल्ला म्हणाले, मी कालच राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आजच्या हाकालपट्टीला काहीच अर्थ नाही. जे लोक कमिशनवर जगतात. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या कार्यालयात सायंकाळी साडेपाचनंतर फाईल्स घेऊन कमिशनवर जगणारे कॉंग्रेसमध्ये आहेत तोवर त्या पक्षाला भवितव्य नाही. या नेत्यांची नावे घ्यायची असतील तर तीही घेण्याची माझी तयारी आहे.

सीसीटीव्ही तपासल्यास मी काय म्हणतो ते समजून येईल. जे आपल्या पायावर धड उभे राहू शकत नाहीत त्यांना उमेदवारी देऊन मलई उकळणाऱ्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवण्याची गरज नाही. चोडणकर यांची कॉंग्रेसमध्ये सध्या कोंडी झाली आहे. पक्षाचा विधीमंडळ गट एकीकडे तर संघटना दुसरीकडे अशी स्थिती आहे. चोडणकर यांनी विधीमंडळ गटाचा कैवार घेतल्याने संघटनेकडे दुर्लक्ष झाले आणि नाराजी आहे. चोडणकर यांनीही कंटाळून राजीनामा याआधी दिला होता. पक्षाची एकनिष्ठ नसणाऱ्यांची पक्षात सध्या चलती आहे. त्यामुळे पक्ष संपायला निघाला आहे. माझा सन्मान ज्या पक्षात होईल आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न जो प्रश्न सोडवणार त्या पक्षात मी जाणार आहे. आज भाजपमध्ये असलेले हे पूर्वीचे कॉंग्रेसचेच आमदार होते त्यामुळे त्यांच्याशी माझी जवळीक असणे साहजिक आहे. त्याला उलट सुलट अर्थ कोणी काढू नये, असे ते म्हणाले.

आणखी वाचा

दिवाळी भेट म्हणून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना कांदे, टोमॅटो

संबंधित बातम्या