महापौरांना आयुक्त भेटेनात!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

महापौर उदय मडकईकर यांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर महापालिकेत जाण्यास सुरवात केल्यास आता एक आठवडा झाला आहे. तरीही आयुक्त महापौरांना भेटले नाहीत.

पणजी : महापौर उदय मडकईकर यांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर महापालिकेत जाण्यास सुरवात केल्यास आता एक आठवडा झाला आहे. तरीही आयुक्त महापौरांना भेटले नाहीत, त्यामुळे आज महापौरांनी महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांकडे आपली उद्विग्नता व्यक्त केली.

त्यांनी या अधिकाऱ्याकडे मनातील सर्व खदखद व्यक्त करण्यामागे हा अधिकारी आयुक्तांना वरचेवर कामानिमित्त भेटत असतो. महापौर उदय मडकईकर यांनी गेल्या सोमवारपासून (ता. १९ ऑक्टोबर) महापालिकेत येण्यास सुरवात केली आहे.

भावाच्या निधनानंतर लगेचच कोरोनाचा त्यांना सामना करावा लागला. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी काही दिवस घरी विश्रांती घेतली आणि मगच महापालिकेत येण्यास सुरवात केली. पहिले एकदोन दिवस आयुक्त संजित रॉड्रिग्स भेटतील अशी अपेक्षा त्यांना होती. आता एक आठवडा झाला तरी आयुक्त महापौरांना भेटतच नाहीत, हे लक्षात आल्याने मडकईकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याकडे आपली मनातील खदखद व्यक्त केली. या अधिकाऱ्याचा आयुक्तांकडे सतत संपर्क असतो, त्यामुळेच महापौरांना खास त्यास बोलवून आपली मनातील खदखद त्याच्यापुढे व्यक्त केली.

संबंधित बातम्या