Covid-19 Goa: राज्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवणार तज्ज्ञ डॉक्टरांची 'अ‍ॅक्शन कमिटी'

Doctor goa.jpg
Doctor goa.jpg

पणजी: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Covid-19 Third Wave) सामना करण्यासाठी सरकारने सुयोग्य नियोजन करण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) अध्यक्षतेखाली काल कृतिदल स्थापन केल्यानंतर आज तज्ज्ञ डॉक्टरांची (Doctor) कृती समितीही स्थापन केली आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच, तर राज्यातील 18 वर्षांखालील मुलांवर कोणत्या प्रकारे परिणाम होऊ शकतो, त्यासाठी मुलांची (Childrens) योग्य काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला आहे. त्यादृष्टीने सरकारने गोवा  वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील डॉक्टरांची कृती समिती (Action Committee) स्थापन केली आहे. (committee of doctors was set up to save Goa from the third wave)

या समितीमध्ये सरकारी डॉक्टरांसह राज्यातील खासगी बालरोग तज्ज्ञ तसेच इतर डॉक्टरांचाही समावेश करण्यात आलेला आहे. आज या समितीची पहिली बैठक डॉ. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर, गोमेकॉच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. मीमी सिल्वेरा, प्रसुती तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉ. विरेंद्र गावकर, डॉ. शिवानंद गावस, डॉ. उत्कर्ष बेतोडकर, डॉ. आलटेकर, डॉ. हर्षद कामत, आयएमए गोवा अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी व कृतिदलाचे सदस्य सचिव डॉ. जगदीश काकोडकर उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन डॉ. बांदेकर यांनी आजच्या बैठकीत झालेल्या विविध चर्चेबाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी डॉ. हर्षद कामत, डॉ. मीमी सिल्वेरा व सदस्य सचिव डॉ. जगदीश काकोडकर उपस्थित होते.

डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर या समितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मुलांना तिसऱ्या कोरोना लाटेचा कोणत्या प्रकारे त्रास होऊ शकतो? त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

दोन वर्षाचे मूल असलेल्या माता व आजारी मुले यांना सर्वप्रथम  कोरोना प्रतिबंधक लस द्यावी असा प्रस्ताव यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आला. त्याच बरोबर राज्यातील सरकारी इस्पितळांमध्ये व खासगी इस्पितळांमध्येसुद्धा कोरोनाबाधित मुलांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खास खाटा आरक्षित ठेवण्याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठवण्याचे ठरले.

डॉ. हर्षद कामत यांनी सांगितले, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर आपली ही समिती भर देणार आहे. त्यासाठी नवजात बालक ते पाच वर्षे, सहा वर्षे ते अकरा वर्षे व 12 ते 18 वर्षे असे तीन वयोगट तयार करण्यात आलेले असून त्यावर उपचार करण्यासाठी विविध मुद्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. ज्या मुलांवर सरकारी इस्पितळात किंवा खासगी इस्पितळात उपचार न करता घरातच उपचार केले जातील त्याबाबतही त्यांच्या कुटुंबांना कोणत्या सूचना द्यायला हव्यात, कोणती सुरक्षितता पाळायला हवी याबाबतही खास नियमावली तयार करण्याचेही ठरले आहे.

गोमेकॉत 100 खाटा उपलब्ध करणार
18 ते 44वयोगटातील 12 टक्के नागरिकांना सध्या कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. 18 वर्षांखालील जी मुले आहेत त्यांच्यासाठी कोणत्या ठिकाणी योग्य उपचाराची व्यवस्था होईल याबाबत इस्पितळाच्या नावासंदर्भात आणि एकूणच सरकारी इस्पितळांसंदर्भात आज चर्चा झाली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शंभर खाटा स्थापन करण्याबाबतही चर्चा झाल्याचे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com