Goa Culture: गोव्यातील उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी समिती स्थापन

पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या गोव्यातील मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी पाचजणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak

Goa Culture: पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या गोव्यातील मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठीच्या स्थळांची शिफारस करण्यासाठी फोंडा येथील एज्युकेशन संस्थेच्या रवी नाईक महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीला 30 दिवसांत या स्थळांची शिफारस करण्याच्या सूचना करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समितीतर्फे राज्यातील उद्ध्वस्त मंदिरांचा अभ्यास करण्यात येणार आहेे. या अभ्यासानंतर तत्कालीन उद्ध्वस्त मंदिराची नेमकी माहिती,यादी उपलब्ध होणार आहे.

Goa Culture
Mahadayi River: म्हादईप्रश्‍नी न्यायालयीन लढा बळकट करण्यावर भर -राजेंद्र केरकर

या समितीमध्ये रोहित फळगावकर (सहाय्यक प्राध्यापक, संत सोहिरोबानाथ अंबिये सरकारी महाविद्यालय), डॉ. वरद सबनिस (सहाय्यक अधिक्षक पुराभिलेख तज्ज्ञ), बालाजी शेणॉय (पुराभिलेख प्रसिद्धी) व उल्हास के. प्रभू देसाई (पुराभिलेख दस्तावेजमधील लेखक व तज्ज्ञ) यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com