वेर्ण्यात झाड पडून कंपनी व्‍यवस्‍थापक ठार

Sunil Sheth
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

सेनावळी - वेर्णा येथे चारचाकी वाहनावर झाड कोसळल्याने वाहनचालक सुनील रामानंद नाईक (४५वर्षे, मडगाव) यांचा मृत्‍यू झाला. कारवर झाड पडल्‍याने गंभीर जखमी झाल्‍याने त्‍यांना मडगाव इस्पितळात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्‍यांचा मृत्‍यू झाला.

सुनील शेट

कुठ्ठाळी :

सुनील हे वेर्णा येथील तुलीप डायग्‍नोस्‍टिक कंपनीत व्‍यवस्‍थापक म्हणून कामाला होते. ते जी ए. ०८ ई ३६९१ या क्रमांकाच्‍या मारुती कारने मडगाव येथून वेर्णा येथे येत असताना सकाळी ८.३० वा.च्‍या सुमारास हा अपघात घडला. वेर्णा पोलिस उपनिरीक्षक प्रविण सिमेपुरुषकर यांनी अपघाताचे तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. अग्‍निशामक दलाने कारवर पडलेले झाड कापले. पंचनामा झाल्‍यावर मृतदेह हॉस्‍पिसियोच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. त्यावर उद्या शवविच्छेदन प्रक्रिया केली जाईल.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या

फोटो फीचर