झाडे कोसळून घरांचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देणार : बाबूश मोन्सेरात

जी झाडे धोकादायक आहेत, त्यांना मुळापासून कापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Babush Monserrate in Goa Assembly Session
Babush Monserrate in Goa Assembly Session Dainik Gomantak

गोव्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी, घरांवर झाडे पडण्याच्या, घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Babush Monserrate in Goa Assembly Session
मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ सुरूच राहणार : मुख्यमंत्री

आजपासून गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान सर्व विद्यमान आमदारांनी गोव्यातील महत्वाचे विषय विधानसभेत मांडले. दरम्यान, पावसामुळे घरावर झाडे कोसळून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे अशांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन बाबूश मोन्सेरात यांनी दिले.

त्याचबरोबर, जी झाडे धोकादायक आहेत, त्यांना मुळापासून कापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी भाजप सरकारला गोव्यात सुरू होऊ घातलेल्या मोपा विमानतळाबद्दल प्रश्न केला. ते म्हणाले की, 'मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होणार का?

यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, दाबोळी विमानतळाचे कामकाज बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ सुरूच राहणार. मोपामुळे राज्यात दररोज 150 विमाने उतरतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com