Goa Accident खांडेपार येथील अपघातप्रकरणी घरमालकाकडून तक्रार दाखल

खांडेपार येथील अपघातप्रकरणी घरमालकाकडून पोलिसांत तक्रार
Goa Accident News
Goa Accident NewsDainik Gomantak

फोंडा: खांडेपार येथे 29 जुलै रोजी भरधाव कारगाडीची ठोकर बसल्याने घराची भिंत कोसळली होती. याप्रकरणी घराचे मालक संदीप पारकर यांनी संबंधित कारचालकाविरुद्ध फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या प्रती पोलिस उपअधीक्षक तसेच राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्री यांना देण्यात आल्या आहेत.

(Complaint filed by house owner regarding accident in Khandepar)

Goa Accident News
Margaon Municipality अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई

कारचालक सावळो सातोडकर याने बेजबाबदारपणे जीए03 एच 7214 या क्रमांकाची कारगाडी चालवून अपघात केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या अपघातात कारगाडीची ठोकर बसल्याने घराची भिंत कोसळली असल्याने आपल्याला नुकसान झाल्याचे संदीप पारकर यांनी म्हटले असून कारगाडीशी संबंधित कायदेशीर परवाने नसल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कारचालक सावळो सातोडकर हा साखळी मतदारसंघातील डिगणे - कुडणे येथील रहिवासी असून तो पोलिस कर्मचारी आहे आणि अपघातानंतर संबंधित कारचालकाने कारगाडीची नंबरप्लेट काढण्याचा प्रयत्न केला त्यातच अपघात झाल्यानंतर बऱ्याच उशिरानंतर संबंधित कारचालकाची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली असेही या तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com