मिलिंद सोमणविरुद्ध पोलिस तक्रारीची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

गोव्याच्या संस्कृतीला मिलिंद सोमण याच्या किळसवाणा प्रकारामुळे ठेच पोचली असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी श्री. खुटवळकर यांनी केली आहे.​

मुरगाव :  चित्रपट अभिनेता मिलिंद सोमण यांनी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरून निर्वस्त्रवस्थेत धावून अश्लील प्रकाराला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाची तक्रार गोवा सुरक्षा मंचच्या वास्को विभागातर्फे सचिन खुटवळकर यांनी वास्को पोलिसांकडे केली आहे.

गोव्याच्या संस्कृतीला मिलिंद सोमण याच्या किळसवाणा प्रकारामुळे ठेच पोचली असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी श्री. खुटवळकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या