बेकायदा गाड्यांबाबत मडगाव पालिकेत तक्रारी

Complaint in Madgaon Municipality regarding illegal vehicles
Complaint in Madgaon Municipality regarding illegal vehicles

 नावेली : फातोर्डा येथे रवींद्र भवन जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्यांवर विस्तारीकरण करण्यात आल्याने यासंदर्भात पालिकेत अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. पालिका मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्यावर करण्यात आलेले विस्तारीकरण पालिका कामगारांच्या मार्फत मोडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


माजी नगरसेवक रामदास हजारे यांनी आपण हा गाडा आपल्या मामाला घालून दिला होता. याला पाचवर्षे पूर्ण झाली आहेत. आपण रस्ता रुंदीकरणात दुसरीकडे गाडा स्थलांतरित करावा अशी मागणी केली होती. पालिका निवडणूक जवळ आल्याने आपण येणाऱ्या पालिका निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून उभा रहाणार हे आपल्या विरोधातील नगरसेवकांना माहिती आहे त्याना आपला पराभव दिसू लागला आहे त्यामुळे त्यानी आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा आरोप हजारे यांनी केला.


मडगावात अनेक बेकायदा बांधकामे आहेत अनेक जण पालिकेकडून परवाना न घेता व्यवसाय करीत आहेत त्यांच्यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी हजारे यांनी केली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com