Goa Liquor Ban: वारखंड-नागझर क्षेत्रात पूर्ण दारूबंदी!

पंचायतीचा निर्णय : दुकानांना परवाना नाहीच
Goa Liquor Ban
Goa Liquor BanDainik Gomantak

Goa Liquor Ban: वारखंड नागझर ग्रामपंचायतीच्या दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील दारूची दुकाने पूर्वीची व नव्यानेही सुरू करण्यात येणार असलेली दारूची दुकाने कायमची बंद करावीत, असा ठराव मांडून तो सर्वानुमते मंजूर केला.

हा ऐतिहासिक निर्णय घेत असताना आता पंचायतीलाही कायदेशीर बाजूचा विचार करून पुढील पाऊल टाकावे लागणार आहे.

वारखंडच्या सरपंच गौरी जोशालकर म्हणाल्या, गावचे अस्तित्व राखण्यासाठी आणि वारखंड गाव आदर्श गाव बनवण्यासाठी पंचायत क्षेत्रातील दारू दुकाने पूर्णपणे बंद करून यापुढे नव्या दारूच्या दुकानाला परवाना दिला जाणार नाही.

जी पूर्वीची दुकाने आहेत. त्याबाबत कायदेशीर बाजूचा अभ्यास करून कायदेशीररित्या कशा पद्धतीने बंद करता येतील, यावरही अभ्यास केला जाईल. तज्ञांचे सल्ले घेऊन ही दुकाने पूर्णपणे बंद केली जाणार आहेत, असेही जोशालकर यांनी सांगितले.

Goa Liquor Ban
Goa Shigmotsav: पणजीतील शिगमोत्सव तयारीला प्रारंभ : नाईक

पूर्वी जी दारूची दुकाने आहेत, त्यातून पंचायतीला दरवर्षी वीस हजार रुपये महसूल मिळत होता.गावच्या इतिहासामध्ये प्रथमच वारखंड पंचायतीत ग्रामसभेमध्ये जी पंचायत क्षेत्रात दारूची दुकाने पूर्वीची आणि यापुढे परवाने देऊ नये असा ठराव मांडण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com