मडगाव-नुवे पश्‍चिम बगलमार्ग काम पोलिस संरक्षणात पूर्ण करा

खंडपीठाचे निर्देश: अडथळे आणणाऱ्यांची नावे सादर करा
Goa Bench Of Bombay High Court
Goa Bench Of Bombay High CourtDainik Gomantak

पणजी: गेल्या कित्येक वर्षांपासून नावेलीमार्गे मडगाव-नुवे पश्‍चिम बगलमार्गाच्‍या कामाला स्थानिकांकडून विरोध होत आहे. यासंदर्भातच्या स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेतली. जर या कामात अडथळे आणल्यास कंत्राटदाराने पोलिस संरक्षण घेऊन ते सुरू ठेवावे. राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामाला संरक्षण देण्याचे काम पोलिसांचे आहे, असे निरीक्षण गोवा खंडपीठाने सुनाववेळी नोंदवले. दरम्‍यान, पुढील सुनावणी 15 मार्चला होणार आहे.

Goa Bench Of Bombay High Court
सुनिथ फ्रान्‍सिस रॉड्रिग्स यांच्‍यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

या प्रकल्पामुळे तेथील पाणी जाण्यासाठीची वाट अडविली जाईल, असा प्रश्‍न उपस्थित करण्‍यात आला होता. मात्र त्याचा विचार करूनच या वेस्टर्न बायपास रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवावे व त्यात कोणी अडथळे आणत असल्यास त्यांची नावे लेखी स्वरुपात खंडपीठासमोर सादर करावीत. त्यांच्याविरोधात योग्य ती पावले उचलणे शक्य होईल, असे खंडपीठाने तोंडी सांगितले. दरम्‍यान, काही राजकारण्यांकडून कंत्राटदाराला धमक्या दिल्या जात असल्‍याचे समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com