सीईएस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अद्ययावत माहिती तंत्रज्ञान इमारतीचे काम पूर्ण  

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

कुंकळ्ळी शिक्षण संस्थेच्या सीईएस कला व वाणिज्य महाविद्यालयाने सरकारच्या रुसा योजने अंतर्गत उभारलेल्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्वसोयींनी युक्त अशी इमारत वापरात आणली जाणार असल्याचे कुंकळळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी शिक्षण संस्थेच्या सीईएस कला व वाणिज्य महाविद्यालयाने सरकारच्या रुसा योजने अंतर्गत उभारलेल्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्वसोयींनी युक्त अशी इमारत वापरात आणली जाणार असल्याचे कुंकळळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. रुसा योजनेंतर्गत मिळालेल्या अनुदानावर कुंकळ्ळी शिक्षण संस्थेने तीन मजली इमारत उभारली आहे. या इमारतीत वर्ग खोल्यांबरोबरच, क्रीडा कक्ष, आयटी प्रयोग शाळा कक्ष, विद्यार्थिनी सामान्य कक्ष व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या शिवाय सीएसआर योजनेंतर्गत ओएनजीसी या सरकारमान्य संस्थेने दिलेल्या अनुदानावर खुर्च्या, बसण्यासाठी खास बाक व इतर गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. (Completion of updated information technology building of CES College of Arts and Commerce) 

Goa Oxygen Crisis: सोमवारपर्यंत ऑक्सिजनचा प्रश्न सोडवा; गोवा खंडपीठाचे सरकारला...

रुसा योजनेच्या अंतर्गत महाविद्यालयाने अनेक नवीन सुविधा निर्माण केल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देसाई व तज्‍ज्ञ शिक्षक वर्ग तसेच इतर कर्मचाऱ्यांच्‍या सहयोगाने कुंकळली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई व व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शना खाली नवनवीन प्रयोग करीत आहेत. सामान्य लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या महाविद्यालयाचा फायदा सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. उच्च शिक्षणात प्रवेश करणाऱ्या  विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढावी व विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना महाविद्यालयाचा फायदा व्हावा, यासाठी व्यवस्थापन मंडळ कार्यरत आहे. 

कोविड-19 रुग्णांचा भार कमी करण्यासाठी  स्टेप-अप इस्पितळे ठरताहेत फायदेशीर 

नवीन शैक्षणिक वर्षी इमारतीचे उद्‍घाटन
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर सर्वसोयींनी युक्त नवीन इमारतीचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, पाचवी ते पदवी पर्यत शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध असलेल्या कुंकळ्ळी शाळा संकुलात कुंकळ्ळी युनायटेड माध्यमिक विद्यालय, कुंकळ्ळी युनायटेड कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक शाखा उच्च माध्यमिक विद्यालय व कुंकळ्ळी कला व वाणिज्य महाविद्यालय कुंकळ्ळी शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येते. संस्थेतर्फे लवकरच आणखी एका इमारत प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सुविधांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विद्यालयात अनेक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. भव्य असे वाचनालय सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. एनसीसी, एनएसएस, क्रीडा सुविधा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखा चालविल्या जात असून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासा बरोबरच विद्यार्थ्याना योग्य  भवितव्य व योग्य व्यवसाय व उद्योगाचे चयन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. पुढे या महाविद्यालयात विज्ञान शाखेबरोबरच इतर व्यवसायभिमुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
 

संबंधित बातम्या