ई-कृषी संपर्क सेवा शेतकऱ्यांपासून एक 'क्लिक' दूर

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020


शेतकऱ्यांच्या हातात असणाऱ्या मोबाईलवर थेट स्वरूपात आता खात्याचा मेसेज माहिती स्वरूपात जात असल्याने शेतकऱ्यांनाही ही बाब आता सर्व दृष्टीने सोईस्कर बनली आहे.    

   

पणजी : लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी गोवा कृषी खात्याने इ कृषी संपर्क सेवा ही संकल्पना समोर आणली आहे. शेतकऱ्यांच्या हातात असणाऱ्या मोबाईलवर थेट स्वरूपात आता खात्याचा मेसेज माहिती स्वरूपात जात असल्याने शेतकऱ्यांनाही ही बाब आता सर्व दृष्टीने सोईस्कर बनली आहे.  

राज्यभरात प्रत्येक तालुकानिहाय बारा आणि पंचायतीनिहाय शेकडो वॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या व्यासपीठावर हजारो शेतकरी एकतरी आले असून या उपक्रमाचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो आहे. 

कृषी खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार या व्हाट्सअप ग्रुपवर केवळ ऍडमिन मेसेज पाठवू शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही विषयांवर या ग्रुपवर चर्चा होत नाही. या ग्रुपवर केवळ शेतीबाबतची चर्चा होते. जर शेतकऱ्यांना एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर ते ऍडमिनला सरळ संपर्क करू शकतात. त्यामुळे शेती विभागाशी शेतकऱ्यांचा सरळ संपर्कसुद्धा आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार डिचोली २३१ शेतकरी, सांगे १९४ शेतकरी, काणकोण २३७ शेतकरी, फोंडा १२२ शेतकरी, पेडणे १५०० शेतकरी, साखळी २२२ शेतकरी, बार्देश २१९, सालसेत २५२ शेतकरी आहेत. याव्यतिरिक्त इतर समूहावरही शेतकरी आहेत.

संबंधित बातम्या