गोवा मुक्तिदिन हीरक महोत्सवाची इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीमुळे फजिती

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

गोवा मुक्तिदिन हीरक महोत्सव सुरू असताना अचानक एलसीडी टीव्ही संच बंद पडल्यानंतर तांत्रिक कारण पुढे करून एकूण कार्यक्रमाचा विचका केल्याबद्दल कंत्राट दिलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात यावे.

पणजी :  गोवा मुक्तिदिन हीरक महोत्सव सुरू असताना अचानक एलसीडी टीव्ही संच बंद पडल्यानंतर तांत्रिक कारण पुढे करून एकूण कार्यक्रमाचा विचका केल्याबद्दल कंत्राट दिलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. सुमारे ३ कोटी १० लाखांचे कंत्राट देऊनही एजन्सीमुळे गोव्याची मान लाजेने खाली गेली असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केला. 

कोट्यवधी रुपये खर्च करून गोवा मुक्तिदिन सोहळ्यासाठीच्या कार्यक्रमासाठी विविध साहित्य उपलब्ध करण्यासाठीचे कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीला देण्यात आले होते. हा सोहळा सुरू होऊन अवघ्याच काही मिनिटांनी व्यासपीठावर राष्ट्रपती व इतर महनीय व्यक्ती आसनस्थ असताना तेथे स्फोट होण्याचा प्रकार धक्कादायक होता. त्यामुळे घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे. 
गोव्याचा इतिहास दाखविणारी ध्वनीचित्रफीत सुरू झाल्यानंतर व्यासपीठावरील सर्व एलसीडी टीव्ही संच बंद पडले होते. त्यामुळे ही ध्वनिचित्रफीत राष्ट्रपतींसह इतर कुणालाही पूर्ण पाहता आली नाही, असे पणजीकर म्हणाले.

 

अधिक वाचा :

गोव्याच्या जनतेचा आवाज दाबण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हुकुमशाह होऊ नये

गोव्यात गर्भनिरोधकांच्या वापरात वाढ ; विविध माध्यमांद्वारे झालेल्या जनजागृतीचा परिणाम

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव उद्या गोव्यात

संबंधित बातम्या