कसा घेणार गोव्यातील लोकं ‘डीडीएसएसवाय’ सवलतीचा लाभ?

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 मे 2021

सरकारी कोविड इस्पितळावरील असलेला ताण कमी करण्यासाठी सरकारने 27 खासगी इस्पितळात कोविड रुग्णांना उपचार घेण्यासाठी ‘डीडीएसएवाय’ लाभार्थींना सवलती निश्‍चित केल्या आहेत.

पणजी : सरकारी कोविड()Covid-19 इस्पितळावरील असलेला ताण कमी करण्यासाठी सरकारने 27 खासगी इस्पितळात कोविड रुग्णांना उपचार घेण्यासाठी ‘डीडीएसएसवाय’(DDSSY) लाभार्थींना सवलती(Concessions ) निश्‍चित केल्या आहेत. रुग्णांना प्रतिदिन सर्वसाधारण वॉर्डसाठी असलेला 8 हजारांपर्यंतचा खर्च मोफत असेल व त्यावरील खर्च लाभार्थ्याला करावा लागणार आहे. सरकारने(Goa) राज्यात एकूण 27 खासगी इस्पितळातील निम्म्या खाटा कोविड रुग्णांना राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार या इस्पितळामध्ये सुमारे 778 खाटा कोविड रुग्णांच्या उपसाचारासाठी उपलब्ध होणार आहेत. (Concessions have been fixed for DDY beneficiaries for treatment of Covid patients in Goa)

पर्यटकांनो गोव्यात पर्यटनाला येवू नका 

खासगी इस्पितळात कोविड रुग्णांसाठी उपचारासाठी सवलतीच्या दरात शुल्क निश्‍चितीचा आदेश सरकारने काढला होता. हे उपचार दिनदयाळ स्वास्थ्य योजनेखाली (डीडीएसएसवाय) सवलतीखाली उपलब्ध करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सरकारने आज या सवलतीच्या दर निश्‍चितीची अधिसूचना काढली आहे. कोविड उपचाराचा लाभ रुग्णांना ‘डीडीएसएसवाय’ योजनेखालील यादीमध्ये व आयसीयू सुविधा असलेल्या इस्पितळांसाठीच लागू असेल. 

...अशी मिळेल सवलत?
कोविड रुग्णांना प्रतिदिन या खासगी इस्पितळांमध्ये सर्वसाधारण वॉर्डसाठी प्रतिदिन किमान 8 हजार रुपये तर व्हेंटीलेटर्ससह आयसीयू वॉर्डसाठी 19,200 रुपये निश्‍चित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त एक कक्ष दोन रुग्णांमध्ये विभागणी तसेच सिंगल कक्षसाठी अनुक्रमे 10,400 व 12,800 रुपये आकारण्यात येणार आहेत. ‘डीडीएसएसवाय’ योजनेखाली जे कोविड रुग्ण खासगी इस्पितळात दाखल होणार आहेत, त्यांना प्रतिदिन सर्वसाधारण वॉर्डनुसार 8000 रुपये शुल्कात या योजनेत सवलत मिळणार आहे. त्यावरील खर्च त्या रुग्णाला करावा लागणार आहे. 

या नव्या शुल्काच्या पॅकेजमध्ये प्रवेश शुल्क, इंटेंसिव्हिस्ट, प्राथमिक आणि तज्ज्ञ सल्लागार शुल्क, खाट  शुल्क, नर्सिंग, निवासी डॉक्टर, आहार, कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, एक्स-रे, ईसीजी, यूएसजी, 2 डी इको, कार्डियाक मॉनिटर, इन्फ्यूजन पंप, कॅथेटेरिझेशन, सीबीसी, एफबीएसएल पीपीबीएसएल, एचबीए 1 सी, क्रिएटिनिन, यकृत फंक्शन टेस्ट, ब्लड ग्रुप, मल्‍टिविटामिन, व्हिटॅमिन सी, झिंक, व्हिटॅमिन डी, पॅरासिटामोल, अँटासिड, अँटी-एलर्जीक, एचसीक्यू अझिथ्रोमाइसिन, डॉक्सीसाइक्लिन, लेव्होफ्लोक्सासिन आणि डेक्सामेथासोन, इव्हरमेक्थेसिनसह रूटीन औषध, आहार शुल्काचा समावेश असेल.

गोव्यात सध्या कुठल्या ‘स्ट्रेन’चा फैलाव झालाय;  ‘एन440के’ की ‘आंध्र प्रदेश स्ट्रेन’? 

दहा दिवसांच्‍या उपचारासाठी सवलत
या योजनेखालील सवलतीचा दावा फक्त दहा दिवसांच्या उपचारासाठी असणार आहे. ही सवलत फक्त ‘डी 24 तास एक दिवस अशा प्रकारे हिशोब केला जाणार आहे. सहा तासांपेक्षा कमी काळ असल्यास ते गृहित धरले जणार नाही, असे जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

  • यांचा शुल्क पॅकेजमध्ये समावेश नसेल 
  •  रुग्णाच्या आजाराचे निदान 
  •  उपचारासाठी विशेष औषधे 
  •  विशेष उपकरणांचा वापर
  •  इतर विशेष प्रक्रिया वा  शस्त्रक्रिया 
  •  आयसीयूव्यतिरिक्त
  •  प्राणवायूचा जादा वापर

संबंधित बातम्या