नरकासूरांच्या उंचीची अट हटविली

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

पणजी महापालिका कार्यक्षेत्रात नरकासूराची उंचीची आणि ध्वनीक्षेपाची अट मागे घेतल्याचे आज महापौर उदय मडकईकर यांनी माहिती दिली आहे. 

पणजी :  पणजी महापालिका कार्यक्षेत्रात नरकासूराची उंचीची आणि ध्वनीक्षेपाची अट मागे घेतल्याचे आज महापौर उदय मडकईकर यांनी माहिती दिली आहे. महापालिकेने दिवाळीसाठी स्वतःची मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर केली होती. त्यात नरकासूराची उंचीची अट ८ फूट ठेवण्यास परवानगी दिली होती. त्याशिवाय ध्वनीक्षेपक (साऊंड) लावण्यासही बंदी असेल असे जाहीर केले होते. परंतु आता या अटी महापालिकेने हटविल्या असून, नरकासूराची उंची कितीही ठेवू शकणार आहेत. परंतु ध्वनीक्षेपक लावण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, असेही महापौरांनी सांगितले आहे. 

महापालिका कार्यक्षेत्रात नऊ ठिकाणांहून नरकासूर करीत असल्याची कळविण्यात आले आहे. त्याशिवाय पणजी शहरातील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आम्ही वरील दोन्ही अटी काढून घेत आहोत. परंतु इतर अटीमध्ये फटाके वाजविण्यास, रस्त्यांवर नरकासूर उभा करण्यास, त्याचबरोबर नरकासूर पाहण्यास जाणाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन मडकईकर यांनी केले आहे. सतेच  केवळ महापालिकेनेच एसओपी कशासाठी म्हणून आम्ही काही अटी शिथील केल्याचे मडकईकर यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, महापौर यांनी महापालिकेच्या व्हॉट्सॅप ग्रुपवर या माहितीचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी ‘गोमन्तक’मध्ये फोन करून आपली प्रतिक्रिया दिली. महापौरांचा ‘यू’ टर्न आहे. घाईगडबडीत उगाच सुरुवातीला निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या