गोव्यातील पंचायत निवडणुका वेळेत व्‍हाव्‍यात; राज्‍यातील सरपंचांचा सूर

राज्‍यातील 191 पंचायतींपैकी 186 पंचायतींचा कार्यकाळ जून महिन्‍यात संपत आहे.
Panchayat elections in goa
Panchayat elections in goaDainik Gomantak

पणजी : राज्‍यातील 186 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जूनमध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पंचायत निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित होते, पण प्रभागांची पुर्नरचना आणि सर्वोच्च न्‍यायालयाने केलेल्‍या निर्देशानुसार ओबीसी आरक्षण प्रक्रिया अडल्‍याने या निवडणुका होणार की नाही, याबाबत संभ्रम निमार्ण झाला आहे. (Conduct Panchayat elections at earliest says Sarpanch in goa)

Panchayat elections in goa
सत्तरीत काजू कलम केवळ 15 रुपयांत

ओबीसी आरक्षणाविषयी सर्वोच्च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशानुसार पंचायत निवडणुका घेण्यात येतील याची पुढील कार्यवाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी चार दिवसांपूर्वी दिली होती. राजकीय मागासलेपण तपासल्‍याशिवाय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. यासाठी इम्‍पिरियल डाटा तयार करावा लागेल. डाटा गोळा करण्यासाठी काही कालावधी लागेल. यामुळे राज्‍यातील पंचायत निवडणुका होणार की नाही, याचे उत्तर गुलदस्‍त्‍यात आहे. यामुळे विद्यमान पंचायत सदस्य आणि इच्‍छुकांमध्ये घालमेल दिसत आहे.

Panchayat elections in goa
गोव्यात कोरोनाचे 91 सक्रिय रुग्ण; 15 नवे बाधित

याबाबत हळदोणेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सुभाष राऊत यांना विचारले असता ते म्‍हणाले, पंचायत निवडणुका घेण्याविषयी आवश्‍यक ते सोपस्‍कार यापूर्वी व्‍हायला हवे होते. आता तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पुढे जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

राज्‍यातील 191 पंचायतींपैकी 186 पंचायतींचा कार्यकाळ जून महिन्‍यात संपत आहे. पंचायतींच्‍या पुर्नरचनेची अधिसूचना यापूर्वीच जारी झाली आहे. 186 पंचायतींमध्ये यावेळी 6प्रभाग वाढले असून एकूण प्रभागांची संख्या 1528 झाली आहे. राज्‍यात 5 सदस्यीय 8 ग्रामपंचायती आहेत. 7 सदस्यीय पंचायती 93 आहेत. 9 सदस्यीय पंचायती 49 असून 11 सदस्यीय 36 पंचायती आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com