गोव्यातील दाबोळी विमानतळावर संशयित बॅग सापडल्याने उडाला गोंधळ

दैनिक गोमन्तक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

इंडिगो एअरलाईन्समधून आलेल्या एका प्रवाशाची संशयित बॅग विमानतळावर सापडल्याने एकच गोंधळ उडाला. बाँब निकामी पथकाने बॅग खोलून पाहिल्यावर त्यात ४ लाख ८० हजार ८०० रुपयांच्या भारतीय नोटा सापडल्या.

मुरगाव: इंडिगो एअरलाईन्समधून आलेल्या एका प्रवाशाची संशयित बॅग विमानतळावर सापडल्याने एकच गोंधळ उडाला. बाँब निकामी पथकाने बॅग खोलून पाहिल्यावर त्यात ४ लाख ८० हजार ८०० रुपयांच्या भारतीय नोटा सापडल्या. त्यामुळे दाबोळी विमानतळावर पसरलेली भीती नाहीशी झाली. तसेच ती बॅग त्या प्रवाशाचा शोध घेऊन त्याच्या हवाली केली.

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहून आलेल्या इंडिगो एअरलाईन्समधून आलेल्या एका प्रवाशाची बॅग विमानतळावर बेवारसपणे राहिली. ही बॅग विमानतळावरील औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेस आली. संशयास्पदरित्या बेवारसपणे सापडलेल्या बॅगमुळे दुपारी दाबोळी विमानतळावर एकच गोंधळ आणि घबराट पसरली. लागलीच बाँब निकामी पथकास बोलावून बॅग त्यांच्या स्वाधीन केली. या पथकाने काळजीपूर्वक बॅग खोलली असता बॅगेत भारतीय नोटा सापडल्या. 

संबंधित बातम्या