सांगे भाजप मंडळाकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

गोवा सरकारने गृह आधार आणि दयानंद सामाजिक योजनेसाठी लागू केलेला उत्पनाचा दाखला कोरोना महामारीमुळे रद्दबादल केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सांगे भाजपा मंडळाने पत्रकार परिषद घेऊन आभार मानले आहे.

सांगे: गोवा सरकारने गृह आधार आणि दयानंद सामाजिक योजनेसाठी लागू केलेला उत्पनाचा दाखला कोरोना महामारीमुळे रद्दबादल केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सांगे भाजपा मंडळाने पत्रकार परिषद घेऊन आभार मानले आहे. 
यावेळी मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक, सरचिटणीस राजेश गावकर, माजी अध्यक्ष आनंद नाईक व महिला मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य भारती नाईक उपस्थित होत्या. 

       यावेळी अध्यक्ष नवनाथ नाईक म्हणाले की या महामारी काळात महिलांना तसेच वयोवृद्धांना उत्पनाचा दाखला मिळविणे कठीण होत होते याची जाणीव लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत व वाढत्या महागाई बद्दल प्रत्येक शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी तीन किलो कांदे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सहकार मंत्री गोविंद गावडे यांचे सांगे भाजपा मंडळ तर्फे आभार मानले. त्याच बरोबर आत्मनिर्भर योजना चालीस लावून सरकारी यंत्रणेला यात सहभागी करून घेतल्या बद्दल अभिनंदन केले. 

      राजेश गावकर म्हणाले की लोकहित पाहून सरकारने चांगला निर्णय घेतल्या बद्दल अभिनंदन करून आत्मनिर्भर भारत बनविण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलले पाऊल स्वागतार्ह असल्याचे स्पष्ट केले. यावेळी राज्यात आणी केंद्रात भाजपा सरकार असताना महागाई कशी वाढली जात आहे असा प्रश्न केला असता महामारी याला कारण असल्याचे उत्तर राजेश गावकर यांनी दिले.      गोव्यात कोळसा हब वरून वादळ उठले असताना तुमची भूमिका काय असेल यावर सरकारने लोकहित पाहून निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवनाथ नाईक यांनी गोव्यात प्रत्येक गोष्टीला विरोध करणे ही फेशन बनली असून कोकण रेल्वेला असाच विरोध केला जात होता आता रेल्वे कशी सोयीची बनली हे सर्वाना माहिती आहे.

संबंधित बातम्या