विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस सक्रीय

पणजी ः पत्रकार परिषदेत बोलताना दिगंबर कामत. सोबत गिरीश चोडणकर व आग्नेल फर्नांडिस.
पणजी ः पत्रकार परिषदेत बोलताना दिगंबर कामत. सोबत गिरीश चोडणकर व आग्नेल फर्नांडिस.

पणजी
विधानसभेची निवडणूक कधीही होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे. या साऱ्याची सुरवात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतून करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही माहिती आज (मंगळवारी) कॉंग्रेस मुख्यालयात दिली. 
कामत म्हणाले, विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. २०२२मध्ये ती होईल असे गृहित धरले तरी कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणे अपेक्षित आहे आणि संघटनेतील मरगळ झटकून नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काम करणे अपेक्षित आहे. 
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा काही काळापूर्वी गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी अनेक प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी चोडणकर यांनीही राजीनामा दिला होता. चोडणकर यांनी आज संघटनात्मक काम नेटाने काम करण्याची गरज आहे. ते गटाध्यक्ष नव्याने नेमतील अशी अपेक्षा आहे. 
वीज दरवाढीविरोधात तालुका पातळीवर आंदोलन केल्यानंतर आज वीज खात्याच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मुख्य अभियंत्याला निवेदनही सादर केले आहे. कालबद्ध पद्धतीने यावर तोडगा काढा अशी मागणी आम्ही केली आहे. विधानसभेत ऑनलाईन शिक्षणाचा विषय आला होता. तेव्हा सरकार मोबाईल मनोरे आणि इंटरनेट जोड याविषयी, स्मार्टफोन यावर बोलत होते.त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले होते की राज्यात पंचायत पातळीपर्यंत जोड पोचले आहेत. स्थानिक केबल ऑपरेटर्सकडून ते घराघरापर्यंत पोचवणे शक्य आहे आणि इंट्रानेटच्या माध्यमातून शिक्षण देणे शक्य आहे. जीबीबीएन ऑप्टिकल फायबर नेटवर्क राज्यभरात आहे. त्याचा वापर केला पाहिजे. या पर्यायाचा विचार सरकारने केला पाहिजे. यातून विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळेल, असे कामत म्हणाले. 
चोडणकर म्हणाले, मी १३ महिनांपूर्वी मी राजीनामा दिला होता. ५० टक्के क्षमतेनेच मी आजवर काम करत आलो होतो. आता पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी केली पाहिजे. एकंदर संघटनात्मक फेरबांधणी सुरु केली आहे. उपाध्यक्ष एम. के. शेख यांच्याकडे संघटना बांधणीचा विषय आहे. मी वर्षभर याकडे लक्ष दिले नव्हते. आता सर्वांनी एकत्र यावे, भाजपविरोधकांनी एकत्र यावे. हुकुमशाहीच्या या सरकारविरोधात लढण्यासाठी एकत्र यावे. सरकारविरोधात जनतेत चीड आहे. त्याचा फायदा कॉंग्रेसलाच होईल. पदाधिकारी लोकांसोबत काम करतील. रस्त्यावर उतरतील. कोविडची परिस्थिती निवळल्यानंतर गट समित्यांना भेट देणे सुरु करणार. पुढील १० दिवस कोणतेही आंदोलन वा जाहीर कार्यक्रम करणार नाही. समाजमाध्यमाचा वापर जनतेचे प्रश्न मांडणार, पदाधिकारी आभासी पद्धतीने जनतेच्या संपर्कात राहतील. 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, तानावडे हे सरकारचे प्रवक्ते नाहीत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सरकारच्या वतीने बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. राजभवन ही भाजपची मालमत्ता आहे का. राजभवनाच्या ठिकाणी कसिनो स्पा करणार का असे विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. राज्यपालांचे पत्र वाचल्यास तानावडे यांना उत्तरे मिळतील. सरकारने स्पष्ट करावे, की राजभवनाच्या जागेती कसिनो स्पा रिसॉर्ट येणार नाही. यावेळी उपाध्यक्ष एम. के. शेख, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके आणि माजी आमदार आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते.

संपादन ः संदीप कांबळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com