काँग्रेसकडून गोवा फॉरवर्ड पक्षाला दोनच जागा

गोवा फॉरवर्डच्या विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांच्या जागा धोक्यात
काँग्रेसकडून गोवा फॉरवर्ड पक्षाला दोनच जागा
vijai sardesaiDainik Gomantak

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीसोबतच काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाला दोन जागाही दिल्या आहेत. मात्र यामुळे गोवा फॉरवर्डच्या संभाव्य उमेदवारांची चांगलीच गोची झाल्याचं चित्र आहे. (Congress allotted only 2 seats to Goa Forward Party)

vijai sardesai
...म्हणून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, लोबोंचं स्पष्टीकरण

गोवा विधानसभेच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती केली होती. त्याचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला होता. या जागावाटपात दक्षिण गोव्यात फातोर्डा आणि उत्तर गोव्यात मये हे दोन मतदारसंघ काँग्रेसने (Congress) गोवा फॉरवर्डसाठी सोडले आहेत. गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी याबाबत घोषणा केली आहे.

vijai sardesai
'काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपने गोव्यात तृणमूल काँग्रेस व ‘आप’ला आणले'

दरम्यान फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई, तर मये मतदारसंघात संतोष कुमार सावंत हे फॉरवर्डचे उमेदवार आहेत. केवळ दोनच जागा मिळाल्याने शिवोलीमधील विद्यमान आमदार विनोद पालयेकर यांच्यासह मांद्रे मतदारसंघात दीपक कळंगुटकर आणि सांत आंद्रेमध्ये जगदीश भोबे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचं चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com