पालिका निवडणुकीसाठी कामत-सरदेसाई यांची युती

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

आगामी विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस व गोवा फाॅरवर्डची युती होईल की नाही याविषयी तर्कवितर्क सुरु असताना  काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एकत्र येऊन मडगाव पालिकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

मडगाव ः आगामी विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस व गोवा फाॅरवर्डची युती होईल की नाही याविषयी तर्कवितर्क सुरु असताना  काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एकत्र येऊन मडगाव पालिकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. कामत यांचे माॅडेल मडगाव व गोवा फाॅरवर्डचे फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलची युती ही निवडणूक लढवणार असल्याचे कामत व सरदेसाई यांनी जाहीर केले. काॅंग्रेसचे कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स हेही या पॅनलच्या युतीचा भाग आहेत. 

मडगाव: मडगाव पालिका निवडणूकीसाठी 30 उमेदवारी अर्ज 

मागच्या (2015) पालिका निवडणुकीतही माॅडेल मडगाव व फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलनी युती केली होती व या पॅनलनेच पालिकेत सत्ता स्थापन केली होती. 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर गोवा फाॅरवर्डने भाजपशी युती करून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली होती. तीन वर्षांनंतर पुन्हा पालिका निवडणुकीत सरदेसाई व कामत एकत्र आले आहेत.

गोवा: राज्यात 8 एप्रिल नंतर तुरळक पावसाची शक्यता 

भाजपला  हटवायचे असेल तर विरोधी पक्षांची एकी आवश्यक आहे. पुढील विधानसभा निवडणुकीतही एकीचा फाॅर्म्युला यशस्वी झला तर गोवा देशाला एक दिशा दाखवू शकेल असे सूचक भाष्य सरदेसाई यांनी यावेळी केले.  कामत व सरदेसाई यांनी एकत्र यावे ही गोव्यातील लोकांची भावना आहे. म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असे सरदेसाई सांगितले.  

 

पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही घरोघरी भेट दिली तेव्हा आम्ही एकत्र यावे अशी भावना मतदारांनी व्यक्त केली. त्यानुसार ही युती होत आहे` कामत यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीतील युती संदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठी योग्य वेळी घेणार आहेत. ही युती एका पालिकेच्या निवडणुकीसाठी आहे आणि येथे पक्षाच्या निशाणीवर निवडणूक लढवण्यात येत नाही, असे कामत यांनी स्पष्ट केले. 

 

संबंधित बातम्या