'आत्माच हरवलेला भारत आत्मनिर्भर कसा होणार?; राजकीय फायद्यासाठी 'राम' म्हणणाऱ्या भाजपवाल्यांना सीतेच्या वेदना कळल्याच नाहीत'

congress attacked on BJPs ignorance towards rape cases
congress attacked on BJPs ignorance towards rape cases


पणजी- आज भारतात अराजकता माजली असून भाजप सरकार आज गुंड, बलात्काऱ्यांना प्रोत्साहन देत असल्यानेच देशात बलात्कार व खुनांचे प्रकार वाढत आहेत. आत्माच हरवलेला भारत आत्मनिर्भर कसा होणार ,असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंभू भाऊ बांदेकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.   


उत्तर प्रदेशातील हाथरस येथिल बलात्कार व खून प्रकरणाचा निषेध करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर, समाजमाध्यम नियंत्रक प्रतिभा बोरकर- ढगे तसेच महिला नेत्या रॉयला फर्नांडिस उपस्थित होते. 

केवळ राजकीय स्वार्थासाठी "राम" म्हणणाऱ्या भाजपवाल्यांना सीतेच्या वेदना कधी कळल्याच नाहीत. त्यामुळेच आज भाजपचे शासन असलेल्या राज्यांत महिलांवर अत्याचार वाढत आहेत, असे प्रतिभा बोरकर म्हणाल्या. आधुनिक भारतात आज सरकारी आशीर्वादाने अनेक दु:शासन स्त्रियांचे वस्त्रहरण करतच आहेत. मोदी- योगी- शहा रूपी धृतराष्ट्र डोळे बंद करून बसले आहेत, असेही त्या पुढे म्हणाल्या म्हणाल्या. 

हाथरसच्या १९ वर्षाच्या कन्येवर बलात्कार झाल्यानंतर आठ दिवस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणतीच कारवाई केली नाही. बलात्काराचे पडसाद देशभर उमटल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना जाग आली. त्यांनतरच खास तपास पथकाचे गठन करण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्या मुलीचा बळी गेला होता, असे सांगून शंभू भाऊ बांदेकर यांनी उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र निषेध केला. 

काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर यांनी आज देशात दलीत समाजासमोर कठीण आव्हाने उभी असल्याचे सांगून केंद्रातील भाजप सरकार एक प्रकारे दलितांचे शोषण करत असल्याचा आरोप केला. 

काँग्रेसच्या महिला नेत्या रॉयला फर्नांडिस यांनी यावेळी निर्भया बलात्कार प्रकरणांतील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी उभारलेल्या आंदोलनात दिल्लीत आपण सहभागी झालो होतो असे सांगून त्यावेळी असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, असे सरकार सांगत असल्याची आठवण करून दिली. परंतु, आजपर्यंत परिस्थिती तशीच असल्याचे सांगून सरकारने महिलांच्या रक्षणासाठी कडक कायदे अंमलात आणावेत, अशी मागणी रॉयला फर्नांडिस यांनी यावेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com