कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

dainik gomantak team
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

काँग्रेसने हा देशव्यापी कार्यक्रम जाहीर केल्यामुळे गोव्यातही आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. देशाबरोबरच गोव्यातील शेतकरीही पेटून उठले असून पूढील काही दिवसांत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला. 

पणजी- केंद्र सरकरने लादलेल्या शेतकरीविरोधी कृषी कायद्याचा निषेध  करत गोव्यात काँग्रेसने दोनापावल येथे 'चलो राजभवन' भव्य मोर्चा काढला. हा कायदा कष्टकरी शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने तो त्वरित मागे घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राज्यपालामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन करण्यात आली. 

काँग्रेसने हा देशव्यापी कार्यक्रम जाहीर केल्यामुळे गोव्यातही आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. देशाबरोबरच गोव्यातील शेतकरीही पेटून उठले असून पूढील काही दिवसांत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला. 

शेतकरीविरोधात लादलेला हा कायदा कडक असून देशात  ब्रिटीशांनाही शक्य झाले नाही, ते केंद्र सरकारने करून दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करत देशाची संपत्ती विकायला काढली आहे. देशाला दारिद्र्यात ढकलून त्यांच्या जवळच्या मित्रांना व कंपन्यांच्या मालकांना त्यांचा फायदा करून देण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर, विधीमंडळ नेते दिगंबर कामत, मोर्चाचे संयोजक माजी आमदार आग्नेल फर्नांडीस, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, किसान कक्षाचे संयोजक अभिजीत देसाई, स्थानिक शेतकरी प्रतिनिधी जोसेफ आफान्सो व जुझे डायस यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. राज्यपाल अनुपस्थित असल्याने त्याच्या सचिवांना हे निवेदन देण्यात आले.        

संबंधित बातम्या