अग्निवीर म्हणून प्रथम भाजपने आपल्या मुलांना भरती करावे

कॉंग्रेसचे प्रवक्ते कॅ. विरियातो फर्नांडिस यांचा सल्ला
अग्निवीर म्हणून प्रथम भाजपने आपल्या मुलांना भरती करावे
Agneepath schemeDainik Gomantak

पणजी: केंद्र सरकारने सेनेमध्ये भरतीसंदर्भात काढलेल्या अग्निपथ योजनेचे समर्थन भाजपचे मंत्री, खासदार, आमदार करीत आहेत. ही योजना इतकी उत्तम असेल, तर त्यांनी प्रथम आपल्या मुलांना ‘अग्निवीर’ म्हणून भरती करावे, असा सल्ला गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पक्षाचे नेते संजय बर्डे उपस्थित होते.

(Congress attacks BJP over Agneepath scheme)

Agneepath scheme
विधवा प्रथेविरोधात ग्रामीण गोवा सरसावला

कॅ. फर्नांडिस म्हणाले, अग्निपथ योजना ही देशातील तरुणांसाठी अविश्वसनीय व अन्यायकारक आहे. तरुणांच्या भवितव्यासाठी सरकारने विचार करून ही योजना त्वरित रद्द करावी. अग्निवीर म्हणून भरती होणाऱ्या युवकांना चार वर्षांसाठी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे योजनेत म्हटले आहे. परंतु, चार वर्षात सेनेचे प्रशिक्षण देणे शक्यच नाही. किमान सात ते दहा वर्ष प्रशिक्षणासाठी जातात. मी स्वतः नौदलमध्ये होतो, असेही ते म्हणाले.

सेना ही नेहमीच सन्मानित, आदरणीय आणि मानाची संस्था राहिली आहे. जी आपल्या राष्ट्रातील निष्ठा आणि देशभक्तीचे उत्कृष्ट गुण प्रदर्शित करते. सेनेत सामील होण्यामागे आपल्या पोटा-पाण्याचा विचार असतो, असे कॅ. विरियातो फर्नांडिस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com