बायंगिणी येथे कचरा प्रकल्प काँग्रेसनेच आणला: सिद्धेश नाईक

Congress brings waste project at Bayangini: Siddhesh Naik
Congress brings waste project at Bayangini: Siddhesh Naik

पणजी :  बायंगिणी कचरा प्रकल्पाविषयी स्थानिक लोक खासदार श्रीपाद नाईक यांच्याकडे आले होते. त्यामुळेच खा. नाईक हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना बायंगिणी प्रकल्पाविषयी भेटले. काँग्रेसने जे खासदार श्रीपाद नाईक यांच्यावर आरोप केले, ते आरोप त्यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनी  आज पत्रकार परिषद घेऊन खोडून काढले. 

सिद्धेश नाईक म्हणाले की, बायंगिणीचा प्रकल्प हा काँग्रेसनेच आणला आहे. सध्या काँग्रेस या प्रकरणाचा फायदा घेऊ पाहत आहे, आजपर्यंत कुंभारजुवे काँग्रेस गटसमितीने या प्रकल्पाला विरोध का केला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच खा. श्रीपाद नाईक यांनी मत व्यक्त केल्याचा काँग्रेसचा आरोप असून, येथील काँग्रेसची गट समितीच अस्तित्वात नाही. काल काँग्रेस पक्षाने जी पत्रकार परिषद घेतली, ती वेगळ्याच विषयावर गेली. आजपर्यंत बायंगिणी कचरा प्रकल्पावर कधीही शब्द काढला नाही, तोच काँग्रेस पक्ष आम्ही राजकारण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो, असे सांगत आहे. 

ते पुढे म्हणाले की, स्थानिकांची एक मागणी असून, मुख्यमंत्र्यांनी त्या जागेची व परिसराची पाहणी करावी अशी इच्छा आहे. तेच आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी गेलो होतो, त्यानुसार मुख्यमंत्री सावंत यांनी आमची मागणी मान्य केली आहे. येथील विशाल वळवईकर यांनी केलेले आरोप सिद्धेश नाईक यांनी पुराव्यानुसार खोडून काढले. जरी या प्रकल्पाविषयी ई निविदा काढली असली तरी प्रकल्पाची जागा हेरिटेज असून, आजूपाजूला वस्ती आहे त्यामुळे मानवतेच्या नात्याने सरकारने त्याचा विचार करायला हवा, असे ही त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com