Goa Election 2022: काँग्रेस भाजपला स्वबळावर पराभूत करू शकते: पी. चिदंबरम

गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने दिलेला पाठिंबा आम्हाला मान्य आहे असे स्पष्ट संकेत काँग्रेसचे (Congress) प्रभारी पी. चिदंबरम (P chidambaram) यांनी दिले.
P chidambaram
P chidambaramDainik Gomantak

Goa Election 2022: गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने दिलेला पाठिंबा आम्हाला मान्य आहे असे स्पष्ट संकेत काँग्रेसचे (Congress) प्रभारी पी. चिदंबरम (P chidambaram) यांनी दिले. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार आणि गोवा प्रभारी महुआ मोईत्रा आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी एकत्र येवून आघाडी करण्याच्या केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने एक प्रकारे अनुकूलता दर्शवली आहे.

P chidambaram
Goa Police: निवडणुकीच्या तोंडावर गोवा पोलिसांचं बदलीसत्र

पत्रकार परिषदेत चिदंबरम म्हणाले, की काँग्रेस भाजपला (BJP) स्वबळावर पराभूत करू शकते, पण कुणाला पाठिंबा द्यायचा असेल तर पक्ष नाही का म्हणेल? भाजपला पराभूत करण्याचे कॉमन टास्क असलेल्या कोणत्याही पक्षाचा पाठिंबा स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, मी युतीबाबत टीएमसीचे विधान वाचले आहे, परंतु सध्या काही वेळ थांबून आणि प्रतीक्षा पाहणे योग्य राहिल अशी भूमिका त्यांनी घेतली. चिदंबरम म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून चिदंबरम म्हणाले, काँग्रेसचे सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर, त्यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेतला जाईल.

प्रतापसिंग राणे (Pratap Singh Rane) यांना राज्य मंत्रिमंडळाने आजीवन कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर काँग्रेसकडून आतापर्यंत साधकबाधक प्रतिक्रिया व्यक्त येत होत्या. मात्र, चिदंबरम यांनी पहिल्यांदाच पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या निर्णयाचे स्वागत करत ते म्हणाले, की राणे यांनी गोव्याच्या विकासाठी योगदान दिले आहे. भाजपने त्याची दखल घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com