दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नुवे मतदारसंघातून काँग्रेसच्या आसुसियाना रॉड्रिग्ज विजयी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

क्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नुवे मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसच्या उमेदवार आसुसियाना रॉड्रिग्ज १५१ मतांनी विजयी झाल्या.

पणजी : दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नुवे मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसच्या उमेदवार आसुसियाना रॉड्रिग्ज १५१ मतांनी विजयी झाल्या. मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार ब्रिझी बारेटो आघाडीवर होत्या. रॉड्रिग्ज यांच्या विजयाने दक्षिण गोव्यात काँग्रेसने आपले खाते उघडले आहे. 

 

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २०० उमेदवारांचे भवितव्य आज होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे. कोविड काळात झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून उत्साह दिसला नसला तरी भाजप व काँग्रेसने दक्षिण व उत्तर गोव्यात बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. मतांची टक्केवारी घटल्याने मतदारराजाने कल कोणाच्या बाजूने दिला आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या निकालानंतर पुढील वर्षीच्या पालिका व २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागून आहे. 

 

अधिक वाचा :

सांताक्रूझ मतदारसंघाच्या विजयी उमेदवार काँग्रेसच्या शायनी ओलिव्हेरा 

ताळगाव मतदारसंघातून भाजप उमेदवार अंजली नाईक सुमारे २३०० मतांनी विजयी

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निकालांमध्ये भाजप आघाडीवर 

संबंधित बातम्या