शेतकऱ्यांचे हक्क सांभाळण्यास काँग्रेस पक्ष वचनबद्ध : जोजफ डायस

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

भाजप पक्ष श्रीमंतांचा उदोउदो करण्याचे धोरण राबवण्यात व्यस्त असून त्यामुळेच भाजप सरकारने शेतकरी विरोधी कायदे देशात आणले आहेत. कॉंग्रेस पक्षाचा या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध असून आम्ही शेतकऱ्यांचे हक्कांचे रक्षण करण्यास वचनबद्द आहोत, असे दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जोजफ डायस यांनी काँग्रेसतर्फे आयोजित लोहिया मैदानावरील धरणे कार्यक्रमात सांगितले.

मडगाव :   भाजप पक्ष श्रीमंतांचा उदोउदो करण्याचे धोरण राबवण्यात व्यस्त असून त्यामुळेच भाजप सरकारने शेतकरी विरोधी कायदे देशात आणले आहेत. कॉंग्रेस पक्षाचा या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध असून आम्ही शेतकऱ्यांचे हक्कांचे रक्षण करण्यास वचनबद्द आहोत, असे दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जोजफ डायस यांनी काँग्रेसतर्फे आयोजित लोहिया मैदानावरील धरणे कार्यक्रमात सांगितले.  लोक विरोधी भाजप आज केवळ मोदींचा उदोउदो करीत असून त्यामुळे त्यांना लोकांचा आक्रोश ऐकू येत नाही, असे डायस पुढे सांगितले. 

कॉंग्रेस पक्षाच्या शेतकरी कायद्याविरोधी राष्ट्रीय आंदोलनाचा भाग म्हणूनहा धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतात अनेक प्रकल्प उभारले. रेल्वे, दळणवळण, दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. हरित क्रांती व धवल क्रांतीने शेतकऱ्यांना ऊर्जा मिळाली, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी सांगितले.

भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या कृषी प्रधान पंजाबच्या अकाली दलाने आज भाजपची साथ सोडली आहे  याचा भाजप नेत्यांनी बोध घ्यावा व आत्मपरिक्षण करावे,  असे आल्तिनो गोम्स  यांनी सांगितले.  

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यास वचनबद्ध असून सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घेईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार असल्याचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई म्हणाले. धरणे कार्यक्रमात प्रदेश कॉंग्रेस समिती, जिल्हा कॉंग्रेस तसेच गट समिती सदस्य सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या